मानोरा (Washim) :- मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे खर्डा, वार्डा ग्राम पंचायत अंतर्गत गावात करण्यात आलेल्या तांडा सुधार वस्तीत व दलीत वस्तीत करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाचे सिमेंट काँक्रिट रस्त्याची तक्रार प्राप्त होताच सभापती सौ सुजाता अरूण जाधव यांनी विस्तार अधिकारी यांना सोबत घेत घटना स्थळी पोहचून विकास कामाची पाहणी केली.
सुधार वस्ती व दलीत वस्तीत सिमेंट काँक्रिटचे विकास कामे करण्यात आली
गट ग्राम पंचायत खेर्डा, वार्डा येथे ग्राम पंचायत मार्फत कंत्राटदारांची नेमणूक करून तांडा सुधार वस्ती व दलीत वस्तीत सिमेंट काँक्रिटचे विकास कामे करण्यात आली. सदर रस्त्याचे काम नियमानुसार नसून निकृष्ट (Inferior) असल्याची तक्रार पंचायत समितीच्या सभापती सौ. सुजाता जाधव याजकडे उपसरपंच, तीन ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने सभापती जाधव हया विस्तार अधिकारी यांच्यासह रस्ता काम स्थळी जाऊन पाहणी केली. व निकृष्ट दर्जाचे (Inferior quality) विकास काम करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.