हिंगोली (Hingoli Police) : पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपुन छपून चालणाऱ्या अवैध पंचाबाबत कडक भूमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील आणि चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना निद्यमित तपासणे व त्यांच्या विरुध्द कहक प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे.
त्याचाच भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी, अवैध धंदे विरुद्ध कार्यवाही, फरार व पाहीजे तसेच न्यायालयाचे वारंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतुने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनात ८ फेब्रुवारी रोजी पासुन फेब्रुवारी रोजी सकाळी ४ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्वच (Hingoli Police) पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते.
सदर मोहीमेत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसारे, पो. नि. विकास पाटील, स्था, गु.शा., पो. नि. विष्णुकांत गुट्टे. पो. नि. नरेंद्र पाडळकर, पो. नि. गणेश राहीरे, पो. नि. मोहन भोसले, म पो. नि. श्रीमती नाईक, पोनि सुधीर वाघ, पो. नि. होगरे, पो. नि. सानप, सपोनि राम निरदोडे, सपोनि आडे, सपोनि झळके, सपोनि जाधव, सपोनि बोराटे,तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि कपिल आगलावे, पोउपनि विक्रम विदुबोने व सर्वच पोलीस स्टेशन मधील (Hingoli Police) दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते. सदर मोहीमेत एकुण ५२ ठिकाणी जिल्ह्यातील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहीजे असलेले आरोपी, रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार, तसेच मिश्रवस्ती मध्ये तपासणी करण्यात आली.
सदर मोहीमेमध्ये न्यायालयाकडुन वेळोवेळी समन्स निघुनही तारखेवर न्यायालयात हजर राहात नवहते व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते. अशा इसमांविरुध्द एकुण ५ नॉन वेलेबल वॉरंट, वेलेबल वॉरंट समन्स बजावणी करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यातील हॉटेल, द्यावे, लॉज, रेल्वेस्टेशन, बसस्थानकात तपासणी करण्यात आली. तसेच अंधाराचा फायदा घेवुन चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या मिळून आलेल्या एकुण ३ इसमांविरुध्द कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध व्यवसायाविरुध्द एकुण कार्यवाही करण्यात आल्या, जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येवून वाहनांची कसुन तपासणी करण्यात आली. तसेच (Hingoli Police )हिंगोली जिल्ह्यातील बँक, ए.टि.एम. तपासणी करण्यात आली.