निलंगा(Latur) :- निलंगा शहरातील व मुख्य मार्गावरून बेशिस्त पळणाऱ्या वाहनांना शिस्त लावण्यासाठी निलंगा पोलिस अॕक्टीव्ह मोडवर(Active mode) आले असून स्पेशल ड्राईव्हद्वारे ३५ केसेस करून ३९ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या धडक कारवाईने वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत.
धडक कारवाईने वाहनधारकांचे धाबे दणाणले
उपविभागीय पोलिस अधिकारी डाॕ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस स्टेशन निलंगा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे निलंगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांचे आदेशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक श्री. पल्लेवाड तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय बिरादार, संदीप कांबळे आदीने विशेष मोहीम राबवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरुद्ध मोटार वाहन कायद्याखाली १) विना लायसन्स वाहन चालवणे २) विना सीट बेल्ट वाहन चालवणे ३) विना हेल्मेट मोटार सायकल चालवणे ४) रनिंग मोबाईल ५) फ्रंट शीट बसवून प्रवासी वाहतूक करणे ६) वाहनाचे कागदपत्र जवळ न बाळगणे ७) वाहनावर रजिस्ट्रेशन नंबर न टाकणे अशा विविध कलमाखाली ३५ केसेस करून ३९ हजार रुपयांचा दंड आकारला. माहे १ सप्टेंबर ते आजपावतो २७६ वाहनांवर कार्यवाही करून २ लाख ५२ हजार रुपये दंड आकारले आहेत त्यामुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. आता शहरात चालणाऱ्या विविध अवैध धंदेवाल्यावरही कारवाई (action) केली जाणार असून रात्री ११ वाजण्याच्या आत हाॕटेल, धाबे, बिअर-बार उघडे ठेवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.