हिंगोली (Mahakumbh 2025) : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या कुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळाला कोट्यावधी भाविक येत आहेत. भाविकांसाठी उद्या रेल्वे सोडण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश येथील प्रयागराज (Mahakumbh) 2025 महाकुंभ मेळ्याला जाण्याकरीता नांदेड-पटणा- नांदेड, औरंगाबाद-पटणा- औरंगाबाद,काचीगुडा- पटणा- काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा- सिकंदराबाद विशेष रेल्वे प्रयागराज छिवकी मार्गे चालविण्यात येत आहेत.
रेल्वे गाडी क्रमांक 07099 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
रेल्वे गाडी क्रमांक 07100 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील. (Mahakumbh 2025) रेल्वे गाडी क्रमांक 07101 औरंगाबाद- पटणा ही विशेष गाडी औरंगाबाद येथून 19 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ 7 वाजता सुटेल आणिजालना, सेलू ,परभणी,पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
रेल्वे गाडी क्रमांक 07102 पटणा ते औरंगाबाद विशेष गाडी पटणा येथून दिनांक 21 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच औरंगाबाद येथे अनुक्रमे दिनांक 23 फेब्रुवारी आणि दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 07.45 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील. रेल्वे गाडी क्रमांक 07103 काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही (Mahakumbh 2025) विशेष गाडी काचीगुडा येथून 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 16:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, , इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.