हायवेवरील तिवसा-मोझरी दरम्यान घटना
कारचालक अपघातात गंभीर जखमी
तिवसा (Amravati Accident) : अमरावती-नागपूर हायवेने जाणारी भरधाव हुंडाई कार अचानक तिवसा ते मोझरी दरम्यान असलेल्या कालव्याजवळ अनियंत्रित झाली आणि काही क्षणात तुडुंब पाण्याने भरलेल्या कालव्यात कोसळली. रविवारी रात्री 11 वाजताचे सुमारास ही घटना घडली. (Amravati Accident) अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बबन सुनील ठाकूर(वय 30,रा.आर्वी) हे अमरावती-नागपूर हायवेने कार क्रमांक MH 27,BZ-7188 ने भरधाव जात होते. दरम्यान त्यांचे अचानक वाहनवरील नियंत्रण सुटले व पाहता-पाहता कार काळव्याजवल भिंतींला धडकून कालव्यात कोसळली. मात्र त्यापूर्वीच कार चालक बाहेर पडल्याने तो बचावला असला तरी (Amravati Accident) अपघातग्रस्त कार ही पाण्यावर तरंगत समोरील मोठ्या पाईपलाईनला अडकली असल्याचे दिसताच क्रेनच्या साहाय्याने वाहणाऱ्या कालव्यातून रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास कार बाहेर काढण्यात पोलीस,आयआरबी प्रशासनाला यश आले.
जखमी कार चालकाला उपचारार्थ तिवसा उपजिल्हा रुग्णालयातून अमरावती येथे दाखल करण्यात आले. (Tivasa Police) तिवसा पोलिसांनी (Amravati Accident) अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास (Tivasa Police) तिवसा पोलीस करीत आहे.