कोरेगाव, चोप/गडचिरोली (MLA Krishna Gajbe) : आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी माणसाचा जन्म आहे. सैरावैरा बाहेर धावणारी इंद्रिय, मन यांना काबुत ठेवण्यासाठी अध्यात्म महत्वपूर्ण भूमिका बजावते. अध्यात्म मार्ग कुणी स्वीकारावा कोणी नाकारावा हे सर्वस्वी वैयक्तिक पातळीवर अवलंबून आहे. अध्यात्म केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी उपयोगी पडणे देखील अपेक्षित आहे. असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे (MLA Krishna Gajbe) यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळ व श्री दंत संप्रदायिक मंदिर समिती चोप तसेच संपूर्ण गावकरी मंडळ चोप त्यांच्या वतीने सात दिवशी भागवताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाप्रसंगी समाप्ती व गोपालकाला च्या प्रसंगी प्रतिपादन करण्यात आले होते. दि. 27/12 ला गोपाळकाला व महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते. या सात दिवशी कार्यक्रमाला हरिभक्त परायण रुपेश सिंग महाराजांनी शिव पुराण प्रवचन करण्यात आले. पुढे बोलतांना (MLA Krishna Gajbe) गजबे मनाल्हे कि,अध्यात्म म्हणजे कर्माचा पावित्र्याची संबंध होत नाही.परमार्थ स्वरूप ज्ञान होणे याचा अध्यात्म म्हणतात. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या एक सूक्ष्म सीमारेषा आहेत. असे म्हणातात तिथे विज्ञान संपते तिथे पुढे अध्यात्म सुरू होते. अध्यात्मला सुपर सायन्स असे म्हणतात.
आजच्या संघर्ष मय जीवनात मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे.मनात निर्माण होणाऱ्या चिंता एखाद्या आपत्तीनंतर मनावर निर्माण होणाराआघात या सर्वांचे यशस्वीपणे सामना करताना आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो. जर आपण वेळेचा चांगला उपयोग केला ध्यानाचा अभ्यास शिककन्यात खर्च केला तर मन आणि शरीराला निश्चितपणे त्रास होत नाही. संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने गोपाल काला व महाप्रसाद चे आयोजन करण्यात आला होता.