मंत्रिपद फिरते केले, आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपद फिरते करणार काय?
नागपूर/मुंबई (Uddhav Thackeray) : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमध्ये सहभागी अनेक पक्षांचे आमदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य अजित पवार (Ajit pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर टोमणे मारत मोठे विधान करून महायुती फुटण्याचे संकेत दिले आहेत.
दुसऱ्या दिवशी नागपुर विधिमंडळ अधिवेशनात माझी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नेहमी संपर्कात असतात, सद्या मात्र संपर्क झाला नाही. निवडणूक आयुक्त पद याचीही निवडणूक घ्या.. त्यानंतर एक देश एक इलेक्शन लागू करा. सावरकरांना भारतरत्न का दिल्या जात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सावरकरांना भारतरत्न द्या, असे केंद्राला पत्र लिहिले आहे. आता त्या पत्राचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.
#WATCH | On reports of a few Mahayuti leaders miffed over not being inducted into the newly-formed Maharashtra Government, Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray says, "Let them run the Government, they will find out. Whatever they used to say about me earlier, now it is coming… pic.twitter.com/laaTyEPncW
— ANI (@ANI) December 17, 2024
छगन भुजबळ यांना मंत्री केले नाही, यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांना मंत्री केले नाही याचे मला दु:ख आहे. ते म्हणाले की, महायुती सरकारमध्ये काही बरोबर नाही. एवढं प्रचंड बहुमत मिळवून सरकार स्थापन करणाऱ्या महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र खातेवाटप झाले नाही. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा नाराजीचीच अधिक चर्चा आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टोमणे मारत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मंत्र्यांची ओळख करून देण्याची परंपरा आहे, पण ज्यांच्यावर ईडीचे अनेक खटले आहेत, अशा मंत्र्यांचीही ओळख मुख्यमंत्र्यांना करावी लागली.
यासोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, त्यांना सरकार चालवू द्या, ते कळेल. ते आधी माझ्याबद्दल जे काही बोलत होते, ते आता त्यांच्याबद्दल (महाराष्ट्र सरकार) काय बोलत आहेत, हे सर्वांसमोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा खरपूस समाचार घेत ‘लाडकी बहिणीं’ ऐवजी ‘लाडक्या आमदारांवर’ भर दिला आहे. यासोबतच ठाकरे म्हणाले की, सरकारने लाडकी बहीण योजना तातडीने सुरू करावी आणि आश्वासन दिलेले 2100 रुपये तातडीने द्यावेत, सरकारने महिलांना कोणतेही नियम व अटी न ठेवता पैसे द्यावेत, अशी (Uddhav Thackeray) मागणी केली.