रिसोड (Bhavna Public School) : शैक्षणिक विकासाबरोबर विद्यार्थांचा शारीरिक विकासासाठी भावना पब्लिक स्कूल देगाव येथे दिनांक १७ व १८ जानेवारी २०२५ रोजी इय्यता ज्युनियर के. जी. ते बारावी वर्गासाठी वार्षिक क्रीडा संमेलन उत्साहात संपन्न झाले. (Bhavna Public School) कार्यक्रमाचे उद्घाटन मशाल प्रज्वलित करून झाले. इय्यता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी नयनरम्य रिबीन कवायत सादर केली.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आ.साधनाताई गवळी मॅडम, आ. ज्योत्स्नाताई पाटील मॅडम, कुलदीप पाटील, भुजंग जाधव सर आणि शाळेचे प्राचार्य आनंद मरळगोईकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बोबडे सर यांनी केले. या (Bhavna Public School) दोन दिवसीय क्रीडा संमेलनात भारतीय खेळाबरोबर परदेशी खेळही घेण्यात आले. (Bhavna Public School) मोबाईलचा अतिवापर टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावे, असे आवाहन या प्रसंगी आ. साधनाताई गवळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.