अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात
अमरावती (Sports-cultural festival) : जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खूप नैपुण्य व कला कृती आहे. जिल्हा परिषदेचे कार्यक्रम हे दर्जेदार असतात व उत्साह असतो.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी येथे केले. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी (Sports-cultural festival) क्रिडा महोत्सवाचे उदघाटन गुरुवारला (ता.३०) झाले. याप्रसंगी उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (Zilla Parishad) जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र ह्या होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अश्विनी मारणे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, कृषिविकास अधिकारी मलप्पा तोडकर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ.अरविंद मोहरे, उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने व आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाला शानदार सुरुवात
प्रारंभी दीप प्रज्वलन व प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत गीत तिवसा पंचायत समितीच्या पूनम ब्राम्हणे व चमूने सादर केले याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले की,व्यक्तींतील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे उत्तम माध्यम आहे. व्यक्तींच्या अंगातील विविध कला या महोत्सवाच्या माध्यमातून पुढे येत आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी कला गुण रंगमच्यावर आणायला उत्सुक असतात; परंतु त्यांच्यातील कलेची जोपासना करता येत नाही. म्हणून या (Sports-cultural festival) महोत्सवामुळे त्या कलेला एक व्यासपीठ मिळाले आहे.जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खूप नैपुण्य व कला कृती आहे.जिल्हा परिषदेचे कार्यक्रम हे दर्जेदार असतात व उत्साह असतो.असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले.
आपल्या प्रास्तविकात (Zilla Parishad) जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा क्रीडा महोत्सवाचे सचिव बालासाहेब बायस यांनी विभागीय स्तरावर अमरावती जिल्हा मागील वर्षीप्रमाणे यशवंत होईल, असा विश्वास व्यक्त केला. संचालन गजानन देशमुख, संध्या जामकर यांनी केले तर आभार प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. अरविंद मोहरे यांनी मानले. अशी माहिती क्रिडा संयोजक डाॅ. नितिन उंडे, सहसंयोजक पंकज गुल्हाने यांनी दिली. या चार दिवसीय क्रिडा महोत्सवाचा समारोप फेब्रुवारी रोजी होणार आहे. असे (Sports-cultural festival) क्रिडा महोत्सवाचे प्रसिध्दी समितीचे विनायक लकडे, शकील अहमद, राजेश सावरकर, श्रीनाथ वानखडे यांनी कळविले आहे.
महोत्सवामुळे नवचैतन्य निर्माण होते- संजीता मोहपात्र
दैनंदिन सततच्या कामाचा ताणतनाव कमी व्हावा या करीता दरवर्षी अमरावती जिल्हा परिषद (Zilla Parishad) अधिकारी व कर्मचारी क्रिडा (Sports-cultural festival) आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खूप सुप्त गुण असतात.यासाठी क्रिडा आणि सांस्कृतिक महोत्सव हे एक व्यासपीठ आहे.यामुळे नवचैतन्य निर्माण होते,असे जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र यांनी अध्यक्षीय उद्बोधनातून सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आज (Sports-cultural festival) सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सांस्कतिक कार्यक्रमामध्ये भक्तीगीत, भावगीत, लोकगीत सिनेगीत,हास्यजत्रा,समूहनृत्य, कराओके एकल नृत्य व आदींचा समावेश होता. यात अंजनगाव सुर्जी,मोर्शी,अधिकारी वर्ग,चांदुर रेल्वे, दर्यापूर, चिखलदरा, धामणगाव रेल्वे,नांदगाव खंडेश्वर,तिवसा,भातकुली,धारणी, अचलपूर, मुख्यालय, अमरावती, चांदुर बाजार, वरुड या पंचायत समितीमधील अधिकारी कर्मचारी आपल्या कलेचा आविष्कार सादर केला.परीक्षक म्हणून प्रा.अंबादास घुले, रजत पडोळे, पल्लवी राऊत यांनी कर्तव्य बजावले.
आजपासून वैयक्तिक व सांघिक खेळ
१४ तालुका संघ,१मुख्यालय व १अधिकारी वर्ग असे १६ संघ सहभागी होणार आहे. सांघिक (Sports-cultural festival) व वैयक्तीक स्पर्धा मध्ये क्रिकेट, खो-खो,कबड्डी,व्हॉलीबॉल पासींग,व्हॉलीबॉल स्ट्रोक्स,फुटबॉल,बॅडमिंटन एकेरी,बॅडमिंटन दुहेरी,बॅडमिंटन एकेरी ४५ वर्षावरील,बॅडमिंटन दुहेरी ४५ वर्षावरील,टेबल टेनिस एकेरी,टेबल टेनिस दुहेरी,टेनिक्वॉईट एकेरी,टेनिक्वॉईट दुहेरी,कॅरम एकेरी,कॅरम दुहेरी तसेच १०० मिटर धावणे,थाळी फेक,गोळा फेक,भाला फेक,१०० मिटर धावणे,२०० मिटर धावणे,४०० मिटर धावणे,१५०० मिटर धावणे,१०० मिटर धावणे ४५ वर्षावरील,१०० मिटर धावणे ४५ वर्षावरील,रिले रेस ४-१००,लांब उडी,उंच उडी,थाळी फेक,गोळा फेक,भाला फेक,स्विमिंग ५० मी,स्विमिंग १०० मी,स्विमिंग ५० मी (४५ वर्षावरील),स्विमिंग १०० मी (४५ वर्षावरील) व बुद्धिबळ यात महिला व पुरुष अधिकारी,कर्मचारी सहभागी होणार आहे.