धावपटू मानवी गरकळ

विश्व पब्लिक स्कूलच्या मानवी गरकळची जिल्हास्तरावर अपराजित कामगिरी..!

Runner Manvi Garakal: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या या शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. मानवी संजय गरकळ हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हास्तरावर अपराजित कामगिरी

विश्व पब्लिक स्कूलच्या मानवी गरकळची जिल्हास्तरावर अपराजित कामगिरी..!

Runner Manvi Garakal

 

४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मानवीची बाजी;
विभागीय स्तरावर वाशिम जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व

रिसोड (Runner Manvi Garakal) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच त्यांच्या क्रीडागुणांना वाव देणाऱ्या विश्वा पब्लिक स्कूल, मांगवाडी या शाळेने अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या या शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. मानवी संजय गरकळ हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हास्तरावर अपराजित कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आता ती विभागीय स्तरावर वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
       
आजच्या आधुनिक युगात केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नसून विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हीच गरज ओळखून विश्वा पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातील प्रगतीकडे विशेष लक्ष दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या क्रीडागुणांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास भविष्यात उत्कृष्ट खेळाडू घडू शकतात, या उद्देशाने शाळा विद्यार्थ्यांना भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

शाळेच्या या प्रयत्नांना यश मिळत असून, येथील अनेक विद्यार्थी जिल्हा तसेच विभागीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांसाठी पात्र ठरत आहेत. त्यातच (Runner Manvi Garakal) मानवी संजय गरकळ हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद आहे. तिच्या सातत्यपूर्ण सरावाने, मेहनतीने आणि जिद्दीने हे यश संपादन केले असून, विभागीय स्तरावरील तिच्या आगामी कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
           
या यशाबद्दल शाळेचे संचालक विश्वनाथजी सानप यांनी मानवीचे अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अभ्यासाइतकेच खेळालाही महत्त्व आहे. खेळामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न राहते आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास व जिद्द निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. यावेळी मानवी गरकळ हिने आपल्या यशाचे श्रेय शाळेने दिलेल्या प्रोत्साहनाला तसेच क्रीडाशिक्षक राज वायभासे सर यांच्या मार्गदर्शनाला दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्यामध्ये जिद्द आणि क्रीडाभावना निर्माण झाली असून, भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे तिने सांगितले.

मानवीच्या (Runner Manvi Garakal) या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास तेही मोठे यश संपादन करू शकतात, हे मानवीने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. मानवीच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडाप्रेमींकडून तिचे अभिनंदन होत असून, विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिला सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

टैग्स: Runner Manvi Garakal