ऋतुजा उरगुन्डे सुवर्ण पदक

ऋतुजा उरगुन्डेने भारताचे प्रतिनिधीत्व करून एशिएन स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक!

Rutuja Uragunde Gold Medal: व्हालीबाल खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करून भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात लातूर जिल्ह्य़ातील पानगावची भूमी कन्या ऋतुजा भिमाशंकराप्पा उरगुन्डेचा सिहाचा वाटा

ऋतुजा उरगुन्डेने भारताचे प्रतिनिधीत्व करून एशिएन स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक!

Rutuja Uragunde Gold Medal

 

समस्त पानगावकराना अभिमान व गर्व; पानगावच्या शिरपेचात  मानाचा तुरा

रेणापूर (Rutuja Uragunde Gold Medal) : पहिल्या एशिएन गेम्समध्ये डायरेक्ट व्हालीबाल खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करून भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात लातूर जिल्ह्य़ातील पानगावची भूमी कन्या ऋतुजा भिमाशंकराप्पा उरगुन्डेचा सिहाचा वाटा आहे.
      
३ आक्टोबरला ऋतुजा (Rutuja Uragunde Gold Medal) स्पर्धेसाठी भूतानला रवाना झाली होती, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे अर्थिक परिस्थितीमुळे  भूतानला जाणे रद्द करण्याची वेळ  आली होती परंतु काही दानशूर लोकानी नाव न  सांगण्याच्या अटीवर तिला गरजे पूरती मदत केली त्यांच्या मुळे ती सहभागी होऊ शकली. कुटूंब अश्रु आणून त्याचे आभार मानते.  ते आश्रु संघर्षाची की आनंदाची समजणे अवघड आहे. सुवर्णपदकासाठी नेपाल सोबत सामन्यात कमालीची मात देऊन एशिएन गेम्समध्ये सुवर्ण पदकावर अभिमानाने भारताचे नाव कोरले. रौप्य पदक नेपाल तर कान्स्य श्रीलंकेला मिळाले.

या अभूतपूर्व यशाबद्दल आन्तरराष्ट्रीय खेळाडू ऋतुजा, वडील भिमाशंकर, आई अनिता यांचे अभिनंदन होत आहे. रेणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा  रेणापूर चंद्रचूड चव्हाण,   किरण चव्हाण, सरपंच ज्योती भंडारे, उपसरपंच गोविन्द दुड्डे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गणेश वांगे, कृषी उत्पन्न बाजार. समितीचे संचालक शिवाजीराव आचार्य, महात्मा बसवेश्वर संस्थेचे अध्यक्ष उत्तरेश्वराप्पा हलकुडे,  अंनिसचे अध्यक्ष मुरलीधर डोणे, सिध्देश्वर गालफाडे, आबा हलकुडे, महेशाप्पा हलकुडे, विवेक चव्हाण, अभिजीत चव्हाण, गणेश चव्हाण, विकास चव्हाण, राज्य प्रधान सचिव रूक्साना मुल्ला, अंनिसचे राज्य सहकार्यवाह बाबा हलकुडे, कमल हलकुडे, काजल साखरे, सोलापूर,  किसन कुरे,  शुभम हलकुडे, उमर पठाण, किरण हनवते, अनिकेत हलकुडे, गजानन फुलारी, कल्याण चंदनकेरे यांनी अभिनंदन केले आहे.