हिंगोली(Hingoli):- श्रीक्षेत्र शेगांव येथून जवळपास ७०० वारकऱ्यांसह टाळमृदुंगाच्या गजरात भगवे पताके घेऊन १३ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने निघालेली संत गजानन महाराजांची पालखी विदर्भातून 10 दिवसाच्या पायदळ प्रवासानंतर 23 जून रोजी सकाळी मराठवाड्याचे (Marathwada)प्रवेशद्वार पानकनेरगांव येथे सकाळी 8 वाजता दाखल झाली.
जेसिबिने फूलाचा वर्षाव करत बँड, व फटाक्याच्या जल्लोषात पालखीचे स्वागत
यावेळी हिंगोली जिल्ह्यात भावीक भक्तांनी जेसिबिने (JCB)फूलाचा वर्षाव करत बँड, व फटाक्याच्या (crackers)जल्लोषात पालखीचे स्वागत केले. विदर्भ-मराठवाडा सीमेवर असलेल्या सेनगांव तालुक्यात पानकनेरगांव येथे दुपारचे स्नेहभोजन व थोडा वेळ विश्रांती घेऊन पालखी सेनगांवकडे रवाना होणार आहे. श्रीच्या पालखीचे मराठवाड्यात आगमन होताच ज्या ठिकाणी सकाळ,दुपार आणि सायंकाळ पालखी भोजन व विश्रांतीसाठी थांबते तिथे प्रत्येक घरासमोरील रस्त्यावर आकर्षक रांगोळी,पताका व स्वागताचे फलक व पालखीवर फुलांचा वर्षाव यासह परिसरातील भाविक भक्तांकडून स्वागत केले जाते. पालखी जिथे थांबते तिथे काही वेळ यात्रेचे स्वरूप येऊन टाळ मृदुंगाच्या व गण गण गणात बोते गजरात परिसर दुमदुमून जातो मागील ५४ वर्षाची परंपरा असलेल्या श्रीसंत गजानन महाराज शेगांव ते श्रीक्षेत्र माझे माहेर पंढरी अशा अभंगाप्रमाणे सर्व संतांचे माहेर असलेल्या पंढरीत आपल्या विठ्ठलास भेटण्यास चाललेल्या पायदळ दिंडी सोहळ्याचे विदर्भातून मराठवाड्यात भक्तमंडळीसह गावकऱ्यांतर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करून चहापाणी,फराळ तर कोणी पानाचा विडा तर कोणी बिस्कीट पुडे तर मोठमोठ्या वस्तू वारकऱ्यांना दिल्या जातात तर अनेक ठिकाणी पायपूजन स्वागतही केले जाते.
विश्रांतीच्या ठिकाणी भावी भक्तांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा
श्रीची पालखी नेहमीप्रमाणे हत्ती(Elephants), घोडे(Horses) व सुशोभित रथावर श्रीसंत गजानन महाराजांची मूर्ती विराजमान असून विश्रांतीच्या ठिकाणी भावी भक्तांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा ही पाहायला मिळतात. यावेळी श्री संत गजानन महाराज पालखी साठी पोलीसांचा चोख बंदोबस्त पहायला मिळाला. श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीत पानकनेरगांव येथे आगमन (arrival)झाले असुन यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. तसेच पालखीचे रांगोळी,फटाके फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले त्यानंतर पालखी सोहळा दूपारी पानकनेरगावातून सूलदली, वटकळी, कोळसा मारगे मुक्कामासाठी सेनगांवच्या दिशेने रवाना होणार आहे.