श्री चैतन्य अकॅडमीने सुरु केले नागपुरात पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर
नागपूर (Sri Chaitanya Academy) : परिणामपूर्वक गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देणाऱ्या इनफिनिटी लर्नचा महत्वाचा उपक्रम असलेल्या श्री चैतन्य अकॅडमीने (Sri Chaitanya Academy) महाराष्ट्रातील दुसरे आणि नागपूरमधील पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर सुरू केले आहे. या शिकवणी केंद्राचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात आले. हे नवीन केंद्र नागपूरमधील विद्यार्थ्यांना जेईई मेन्स, जेईइ अॅडव्हान्स आणि नीट परीक्षांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन पुरविणार असून या परीक्षांसाठी त्यांना दर्जेदार शिकवणी मिळणार आहे. या (Infinity Learn) उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी इतर ठिकाणी जावे लागणार नाही.
पश्चिम भारतात आपली उपस्थिती केली आणखी मजबूत
योग्य आणि प्रभावी शैक्षणिक सुविधांची मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांना आपल्या गावातच राहून स्पर्धात्मक परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण घेता यावे या उद्देशाने श्री चैतन्य अकॅडमीने नागपुरातील हे केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमामुळे (Sri Chaitanya Academy) श्री चैतन्य अकॅडमीची पश्चिम भारतातील उपस्थिती अधिक बळकट झाली आहे. नागपूरमधील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिकवणी, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि उत्तम संसाधने मिळावी, त्यांना आपल्या शहरातून बाहेर जावे लागू नये आणि जागतिक दर्जाचे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचावे, या (Infinity Learn) हेतूने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
नागपूरमधील विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेकरिता मिळणार दर्जेदार शिकवणी
श्री चैतन्य ग्रुपच्या (Sri Chaitanya Academy) सीईओ आणि संचालक सुश्री सुषमा बोप्पाना, “श्री चैतन्य गेल्या 40 वर्षांपासून महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्याचे काम करत आहे. 2023 मध्ये आम्ही जेईई मेन्स, जेईइ अॅडव्हान्स आणि नीट परीक्षांमध्ये देशातून पहिला क्रमांक मिळवण्याचा इतिहास रचला आहे. आमचे नागपूर केंद्र याच यशाची पुनरावृत्ती करेल तसेच जेईई आणि नीट परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची पार्श्वभूमी न बघता दर्जेदार मार्गदर्शन मिळेल. आम्ही गणित आणि विज्ञान विषयांवर विशेष भर देतो जेणेकरून कठीण स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची शालेय वयातच मजबूत पायाभरणी होते. त्यामुळे पुढील टप्प्यावर जाताना त्यांना अवघड विषय शिकताना अडचणी येत नाहीत. या केंद्र विस्तारासह आम्ही एक गतिशील शिक्षण वातावरण निर्माण करण्याची आणि नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याची आमची बांधिलकी स्पष्ट करत आहोत.”
भारतभरात 50वे केंद्र सुरू करत गाठले मैलाचे शिखर
इनफिनिटी लर्नचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वल सिंग म्हणाले, “श्री चैतन्यची (Sri Chaitanya Academy) सिद्ध असलेली शिक्षण पद्धती आम्ही नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी आणत आहोत. वैयक्तिक मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि संकल्पनांची सखोल समज हा आमच्या शिक्षण पद्धतीचा गाभा आहे जो आमच्या बच्चा सिखा कि नही या ब्रिदवाक्यातून स्पष्ट दिसून येतो. आपले स्वप्न साकार करण्यासाठी, देशाच्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आणि आपल्यासह आपल्या कुटुंबाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आम्ही या केंद्राद्वारे नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन देणार आहोत. या केंद्राची सुरुवात म्हणजे शिक्षणाचे लोकशाहीकरण आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या मूळ गावी, त्यांच्या सोयीनुसार, भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता उच्च दर्जाची संसाधने उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
श्री चैतन्य अकॅडमी (Sri Chaitanya Academy) – इनफिनिटी लर्न उपक्रमाचे ध्येय नागपूरमध्ये जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स आणि नीट परीक्षांमध्ये देशातून पहिला क्रमांक मिळविण्याच्या मिळवण्याच्या ऐतिहासिक यशाची पुनरावृत्ती करणे आहे. श्री चैतन्य हा आशियातील सर्वात मोठ्या शैक्षणिक गटांपैकी एक असून, 2023 मध्ये त्यांनी जेईई आणि नीट परीक्षेमध्ये टॉप रँकर्स घडवले आहेत. नागपूरमधील हे टेस्ट प्रिपरेशन सेंटर जेईई आणि नीट परीक्षांसाठी विशेष कोचिंग प्रदान करेल तसेच येथे इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीसाठी फाउंडेशन कोर्सेस उपलब्ध असतील. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना संकल्पनांची मजबूत पकड मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान विकसित करता यावे यावर भर दिला जाणार आहे.
हे अत्याधुनिक केंद्र एआय-आधारित वैयक्तिक शैक्षणिक साधने, सुसज्ज ग्रंथालय, प्रॅक्टिस लॅब्स, संपूर्ण टेस्ट सिरीज आणि अनुभवी प्राध्यापकांसह उत्तम पायाभूत सुविधा प्रदान करेल. श्री चैतन्य अकॅडमीचा (Sri Chaitanya Academy) तंत्रज्ञान आणि पारंपरिक शिक्षण पद्धती यांचा समतोल साधून, एक अद्वितीय हायब्रिड शैक्षणिक अनुभव देण्यावर विश्वास आहे. सुलभता, गुणवत्ता आणि परवडणारे शिकवणी शुल्क या गोष्टींना प्राधान्य देत सुरु करण्यात आलेल्या नागपूर आणि नांदेडमधील या नव्या टेस्ट प्रिपरेशन सेंटर्समुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल घडेल.
या केंद्र विस्तारासह (Sri Chaitanya Academy) श्री चैतन्य अकॅडमी आता भारतभरात एकूण 50 केंद्रे चालवत असून जेईई आणि नीट परीक्षांच्या शिकवणीमध्ये अग्रणी म्हणून आपले स्थान बळकट करत आहे. या (Infinity Learn) केंद्र विस्तारामुळे आता विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कोचिंग घेण्यासाठी आणि यश संपादन करण्यासाठी मोठ्या शहरांत जाण्याची गरज पडणार नसून आपल्या गावात राहूनच ते दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील. हा धोरणात्मक विस्तार इन्फिनिटी लर्नला भारतातील अग्रगण्य अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणाऱ्या आघाडीच्या संस्थांपैकी एक म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे.
श्री चैतन्य अकॅडमी बद्दल:
श्री चैतन्य अकॅडमी (Sri Chaitanya Academy) हा इनफिनिटी लर्नचा (Infinity Learn) एक उपक्रम असून आयआयटी-जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांसाठी तसेच शालेय/बोर्ड परीक्षा, ऑलिम्पियाड आणि अन्य फाउंडेशन स्तरावरील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणारे एक संपूर्ण टेस्ट प्रिपरेशन सेंटर आहे. आशियातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थांच्या समूहाचा समृद्ध वारसा आणि सिद्ध झालेले अध्यापन तंत्र वापरून श्री चैतन्य अकॅडमीने वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षांमध्ये सातत्याने अव्वल रँक धारक तयार केले आहेत. ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षण पद्धती आणि उच्च पात्र, अनुभवी शिक्षकांच्या समूहासह श्री चैतन्य अकॅडमी विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी न पाहता त्यांना सर्वोत्तम शिक्षण प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.
इनफिनिटी लर्न बद्दल:
श्री चैतन्यचे (Sri Chaitanya Academy) इनफिनिटी लर्न (Infinity Learn) हे भारतातील एकमेव हायब्रिड शिक्षण प्लॅटफॉर्म आहे, जे मोठ्या प्रमाणावर परिणाम-आधारित शिक्षण पुरवते. प्रीमियम शिक्षण सामग्रीसाठी 70 लाखांहून अधिक सक्रिय सदस्य आणि 7.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते असलेल्या या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला उन्नतीकडे नेणे हे आहे. आमचा प्लॅटफॉर्म विविध अभ्यास संसाधनांनी समृद्ध आहे, ज्यात आधुनिक शैक्षणिक गरजांसाठी तयार केलेल्या प्रश्नांचा विस्तृत संग्रह आणि सुलभ आणि समजण्यास सहज असणाऱ्या शिक्षण साधनांचा समावेश आहे. इनफिनिटी लर्नच्या (Infinity Learn) केंद्रस्थानी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या शिक्षणसामग्रीसह त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासात मदत करणे आहे. आमचे ध्येय शिक्षण सोपे आणि प्रभावी बनवणे आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट शिक्षण मिळू शकेल.