सरयू नदीच्या पाण्याने होणार अभिषेक
कोलंबो (Sri Lanka) : अयोध्येतील भव्य (Ayodhya Ram mandir) राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आता श्रीलंकेत माता सीतेच्या (Sita Mata Temple) भव्य मंदिराचे उद्घाटन होणार आहे. (Sita Mata mandir) सीता माता यांच्या अभिषेक सोहळ्यासाठी भारताने पवित्र सरयू नदीचे (Sarayu river) पाणी श्रीलंकेत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
माता सीतेला समर्पित मंदिर
सीता माता मंदिराचा (Sita Mata mandir) अभिषेक सोहळा 19 मे रोजी होणार आहे. श्रीलंकेच्या प्रतिनिधींनी उत्तर प्रदेश सरकारला पत्र लिहून धार्मिक कार्यक्रमांसाठी सरयू नदीचे पाणी पाठवण्याची विनंती केली होती. मंदिरातील माता सीतेच्या मूर्तीचे अभिषेक (Sarayu river) सरयू नदीच्या पाण्याने करता येणार आहे.
श्रीलंकेत माता सीतेचा अभिषेक
यूपी सरकारच्या निर्देशांनुसार, पर्यटन विभागाकडे पवित्र सरयूचे पाणी श्रीलंकेला पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.राम मंदिर ट्रस्टने या उपक्रमाचे कौतुक केले आहे. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे महत्त्व पटवून दिले आहे. अयोध्या तीर्थ विकास परिषदेचे सीईओ संतोष कुमार शर्मा म्हणाले की, श्रीलंकेत सीता माता मंदिर (Sita Mata mandir) बांधले जात आहे. मंदिराच्या प्रतिनिधीने यूपी सरकारकडे (Sarayu river) सरयू नदीचे पाणी मागितले आहे. सरयूमधून पवित्र पाण्याचा कलश पाठवला आहे. श्रीलंकेला नदीपर्यंत हा विधी 19 मे रोजी होणार आहे.
सांस्कृतिक बंधनाचे प्रतीक सीता माता मंदिर
सीता माता मंदिरातील (Sita Mata Temple) समारंभाचा उद्देश भारत आणि श्रीलंका यांच्यातील अध्यात्मिक आणि सांस्कृतिक बंधनाचे प्रतीक असलेल्या दोन्ही देशांची मने जोडणे हा आहे. दरम्यान, महंत शशिकांत दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करत, श्रीलंकेतील (Sita Mata mandir) सीता माता मंदिर ही सर्व ‘सनातनी’साठी अभिमानाची बाब असेल, असे सांगितले. शशिकांत दास म्हणाले की, ही सर्व सनातनींसाठी अभिमानाची बाब आहे. देवी सीतेने लंकेत अनेक अडचणींचा सामना केला आणि आज त्याच लंकेत भव्य मंदिर बांधले जात आहे.