औंढा नागनाथ/हिंगोली (Srikshetra Aundha Nagnath) : श्रावण मास अनुषंगाने पोलीस अधीक्षक जी श्रीधर (Superintendent of Police) यांच्या उपस्थितीत श्री नागनाथ मंदिर येथे आढावा बैठक संपन्न झाली त्यांनी बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून मंदिर संस्थानला काही मार्गदर्शक सूचना केल्या. श्रावण मास हा सुरू होत आहे. त्यातच ५ ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार असल्याने भारतातील आठव्या ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या (Aundha Nagnath) औंढा नागनाथ येथील भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाच्या तयारीबाबत व सुरक्षा अनुषंगाने मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी दुपारी एक वाजे दरम्यान आढावा घेण्यात आला.
राज्यसह परराज्यातील भाविक (Aundha Nagnath) औंढा नागनाथ येथे श्री नागनाथाच्या दर्शनासाठी येत असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सूचना देत मंदिरामध्ये बॅग नारळ अन्यायावर बंदी घालण्यात आली. तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकातर्फे दर दोन तासाला मंदिर परिसराची व मंदिराची तपासणी करावी, महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, मंदिरातील सीसीटीव्ही अद्यावत ठेवावे, वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर नेमून रुग्णवाहिका तयार ठेवावी अशा सूचना दिल्या आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, मंदिराचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, पुजारी तुळजादास भोपी, सुभाष जैताळे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
दरम्यान (Superintendent of Police) पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या श्रावण सोमवारी दोन उपविभागीय पोलीस अधिकारी सहा पोलीस निरीक्षक, अंमलदार व पोलीस कर्मचारी यांच्यासह 250 अधिकारी कर्मचारी यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे ही नजर राहणार आहे