बुलडाणा (Prataprav Jadhav) : “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ।।” विठुरायाच्या चरणी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) सपत्नीक नतमस्तक होऊन सर्वांना चांगल आयुष्य, आरोग्य लाभो व बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे.. असं साकडं विठूचरणी घातलं.
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो भाविक व वारकरी दिडया
श्रीक्षेत्र पंढरपूर (Pandharpur Yatra) येथे जाऊन विठूराया चरणी नतमस्तक होतात. आषाढी एकादशी निमित्त श्री पांडुरंगाची शासकीय पूजा राज्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहचारिणी सौ.लताताई यांच्याहस्ते संपन्न झाली. यावेळी केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) त्यांच्या सहचरणी सौ. राजश्रीताई जाधव यांनीही या पूजेत सहभाग घेतला.
ना.प्रतापराव जाधव यांची विठूराया चरणी 41 वी वारी..
ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) हे विठुरायाचे परमभक्त, कोरोनाचा दोन वर्षाचा कार्यकाळ सोडला तर गेल्या 41 वर्षापासून ते आषाढी एकादशीला नियमितपणे विठूचरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतात. प्रतापरावाची 41वी वारी महत्वपूर्ण ठरली कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत शासकीय पूजेला उपस्थित राहण्याचा मानही त्यांना मिळाला.