छत्रपती संभाजी नगर विभागात हिंगोली जिल्हा पाचवा
हिंगोली (SSC Result) : :दहावी परिक्षेचे निकाल २७ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाले. (Hingoli district) हिंगोली जिल्हा विभागात शेवटच्या क्रमांकावर कायम आहे. जिल्ह्यात वसमत तालुका प्रथम क्रमांकावर असून जिल्हा मुख्यालय असलेला हिंगोली तालुका शेवटच्या स्थानावर आहे. विभागामध्ये प्रथम क्रमांकावर बीड जिल्हा असून निकाल ९७.४० टक्के, दुसर्या क्रमांकावर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा ९५.५१ टक्के निकाल (SSC Result) तिसर्या क्रमांकावर जालना जिल्हा ९४.९९, चौथ्या क्रमांकावर परभणी जिल्हा ९३.०३ टक्के निकाल लागला आहे.
जिल्ह्यात वसमत पहिल्या तर हिंगोली तालुका शेवटच्या स्थानावर
यंदा दहावीच्या निकालात (SSC Result) जिल्हा विभागात शेवटच्या क्रमांकावर राहिला. जिल्ह्यातील १५ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये प्रवेश घेतला होता. यापैकी १५ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील १४ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पाचही तालुक्यात वसमत तालुक्याचा निकाल अव्वल लागला आहे. या तालुक्याचा निकाल ९४.२६ टक्के लागला आहे. तर त्या पाठोपाठ सेनगाव तालुक्याचा निकाल ९३.५८ टक्के, औंढा नागनाथ तालुक्याचा निकाल ९३.२८ टक्के, कळमनुरी तालुक्याचा निकाल ९१.२७ टक्के तर हिंगोली तालुका ८९.४६ टक्के निकाल लागला आहे.
या परीक्षेत पाचही तालुक्यात मुलापेक्षा मुली अग्रेसर
शिक्षण विभागाच्या (Education Department) वतीने माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९२.२२ टक्के लागला असून जिल्ह्यासह पाचही तालुक्यात मुलापेक्षा मुलीची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. (Hingoli district) हिंगोली जिल्ह्यात मुलाची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८८.९१ टक्के आहे. तर मुलीची टक्केवरी ९५.८७ टक्के आहे. हिंगोली तालुक्यात मुलीची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.०१ टक्के आहे. तर मुलाची टक्केवारी ८५.५३ टक्के आहे. कळमनुरी तालुक्यात मुलीची टक्केवारी ९५.६५ टक्के आहे. तर या तालुक्यातून (SSC Result) मुले उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.२० टक्के आहे. वसमत तालुक्यात मुलीची टक्केवारी ९६.९६ टक्के आहे. तर मुलाची टक्केवारी ९२.०२ टक्के आहे. सेनगाव तालुक्यात मुलीची टक्केवारी ९७.२९ टक्के तर मुलाची टक्केवारी ९०.५३ टक्के आहे. औंढा नागनाथ तालुक्यात मुलीची टक्केवारी ९६.०७ टक्के तर मुलाची टक्केवारी ८९.७५ टक्के आहे. जिल्ह्यासह पाचही तालुक्यात मुलीची टक्केवारी मुलापेक्षा अधिक आहे.
फक्त पास होणार्यांपेक्षा मेरिटच्या विद्यार्थ्यांची संख्या चारपट
कधी काळी बोटावर मोजण्या एवढे विद्यार्थी मेरिट किंवा प्रथम श्रेणीत यायचे तर बहुतांश विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असायचे. शिक्षणाच्या बाबतीत पालक व विद्यार्थी हळुहळु जागरुक होत चालल्याने हे प्रमाण आता व्यस्त झाले आहे. यंदाच्या दहावीच्या निकालात केवळ (SSC Result) उत्तीर्ण श्रेणीतील विद्यार्थ्यांपेक्षा विशेष प्राविण्यासह अर्थात ७५ टक्के पेक्षा अधिक गुण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या चारपट पेक्षाही अधिक आहे. जिल्ह्यातील १५ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती.यापैकी ३५ ते ४४ टक्के गुण घेऊन केवळ उत्तीर्ण श्रेणीत असणार्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी अर्थात १०५६ आहे. ७५ टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या यापेक्षा चारपट ४ हजार ५६२ एवढी आहे. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक ५ हजार १३२ एवढी आहे. या विद्यार्थ्यांनी ६० ते ७५ टक्के दरम्यान गुण मिळविले आहेत. तर ४५ ते ५९ टक्के गुण घेऊन द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची संख्या ३८११ आहे.