रिसोड (Risod Accident) : एसटी बस व दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाल्याची घटना संध्याकाळी सहा वाजता रिसोड शहरातील लोणी फाटा जवळ टी पॉईंट येथे घडली. (Risod Accident) लखन कैलास गायकवाड वय 25 वर्षे राहणार जिजाऊ नगर रिसोड असे मृतकाचे नाव असून, दिनेश दिलीप खडसे वय 40 वर्षे राहणार लहुजी नगर हा जखमी झाला आहे.
अन्य तिसऱ्या जखमी बद्दल माहिती मिळू शकली नाही. मात्र त्याचे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. याबाबत प्रत्यक्ष दर्शी कडून मिळालेल्या माहितीनुसार वाशिम आगाराची बस शिर्डीहून वाशिमकडे जात असताना, संध्याकाळी सहाच्या दरम्यान (Risod Accident) रिसोड शहरातील लोणी फाटा लगत असलेल्या टी पॉइंट येथे चालत असताना इंदिरानगरकडून सदर तीनही युवक एका दुचाकी स्कुटीवर बसून थेट रस्त्यावर आले. यामध्ये तिघे दुचाकीसह बसच्या खाली आले.
यादरम्यान मात्र बस चालकाने तिघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. बस थेट डिव्हायडरवर चढली. या (Risod Accident) ठिकाणी स्थानीक नागरिकांनी एसटी बस खाली अडकलेल्या तीनही जखमींना बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालयात भरती केले. यातील लखन गायकवाड यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी कोणत्याही प्रकारची फिर्याद व पोलीस कारवाई झाली नव्हती.