अकोला (ST Bus Corporation) : महाराष्ट्राची लोकवाहिनी अशी ओळख असलेल्या राज्य परिवहन मार्ग अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी भाडे दरात साधारणत: १५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. लालपरीने प्रवास करणे महागल्याने सर्वसामान्यांना पर्यायी मार्गाचा शोध घ्यावा लागत आहे. सर्वसामान्य प्रवासी रेल्वेकडे वळत आहेत. दरम्यान, या (ST Bus Corporation) दरवाढीबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त करत ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवाशांचं हक्काचं साधन असलेल्या (ST Bus Corporation) एसटीचा प्रवास नव्याने सरकारने महागडे केले आहे. निवडणुकीनंतर पहिला दणका सर्वसामान्य प्रवाशांना बसला. एसटीच्या तुलनेत रेल्वे परवडणारी म्हणून अनेक जण रेल्वेने प्रवास करणे पसंत करित आहेत. असे चित्र अकोला जिल्ह्यात आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एसटीच्या तिकीट दरामध्ये १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. साध्या (ST Bus Corporation) एसटीचे किमान ६ किमीचं भाडे ८ रुपये ७० पैसे इतकं आहे. आता दरवाढीनंतर या टप्प्यासाठी ११ रुपये द्यावे लागत आहेत.
साधारण बसच्या जलद सेवा आणि साधारण (ST Bus Corporation) बसच्या रात्रसेवेच्या या टप्पासाठी ११ रुपये मोजावे लागतील. (ST Bus Corporation) एसटीच्या निम आराम बससाठी सध्याचं भाडं प्रति टप्पा ६ कि.मी.साठी ११.८५ रूपये आहे.आता या टप्प्याच्या प्रवासासाठी किमान १५ रुपये मोजावे लागत आहेत. शिवशाही वातानुकूलीत शिवशाहीसाठी सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ किमीसाठी १२ रुपये ३५ पैसे इतके असून याच टप्प्यासाठी सुधारित भाडेदर प्रति टप्पा १६ रूपये मोजावे लागत आहे.
अकोला जिल्ह्यात अकोला, अकोट, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर या तालुका व शहर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेची सुविधा आहे. यापैकी अकोला हे जंक्शन रेल्वे स्थानक असून अकोल्यातून 130 दैनिक, साप्ताहिक,सुपरफास्ट, एक्स्प्रेस, मेल, पॅसेंजर (मेमू) गाड्या विविध दिशेन धावतात. यामध्ये मेमू, पॅसेंजर सेवा सर्वात स्वस्त आहे. अकोला-अकोट, अकोला-शेगाव, अकोला-बार्शिटाकळी मेमू (पॅसेंजर) प्रवासभाडे दहा रुपये एवढे आहे. याशिवाय मुंबई,पूणे, नागपूर या राज्यातील मोठ्या शहराचा लांबपल्ल्याचा प्रवासही रेल्वेने परवडणारे असे आहेत. असे असले तरी जिल्ह्याचा ग्रामीणभाग रेल्वे सुविधांपासून दूर असल्याने याठिकाणी (ST Bus Corporation) एसटीचा वापर सर्वसामान्यांना करावा लागतो. एसटीतून प्रवास करणार सवलतधारक वर्ग सोडला तर पूर्णभाडे मोजणार प्रवासी एसटीचा प्रवास करतांना विचार करित आहेत. भाडेवाढीनंतर हा बदल प्रकर्षाने जाणवत आहे.
शासनाने प्रवास सवलत योजना राज्यात लागू केल्यानंतर एसटीला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. (ST Bus Corporation) एसटीच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. असे असले तरी नव्यावर्षाच्या प्रारंभीच एसटी महामंडळाने तिकीट भाडेवाढ तब्बल 15 टक्क्यांनी वाढविल्याने मोठा झटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. शासनाने टप्प्या-टप्प्याने भाववाढ करणे प्रवाशांना अपेक्षीत होते. महागाईत सर्वसामान्य वर्ग होरपळून निघत असतांना एसटीनेही यामध्ये तेल ओतण्याचे काम केल्याची भावना , त्रस्त प्रवाशांची आहे. महामंडळात सद्यस्थितीत खिळखिळ्या अन भंगार गाड्या प्रवासी सेवेत आहेत. हे सर्व नियमबाह्य व धोकादायक असतांना सुध्दा सर्व सहनकरित निमुटपणे प्रवास करणार्या सर्वसामान्य वर्गावर भाडेवाढ लादून अन्यायच केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
अकोला शहरापासून इतर शहरांसाठी वाढीव एसटी भाडे
शहर नवीन दर (साधीबस) जुने दर (साधीबस)
नागपूर- ४३२, ३६५
अमरावती – १७२, १५०
शेगाव – ९१, ८०
छत्रपती संभाजीनगर – ४३३, ३७५
जालना – ३२३, २८०
चिखली – १८२, १६५
जळगाव खांदेश – ३३३, २९०
पुणे – ८२५, ७२५
अकोट – ८१, ७०
मुर्तिजापूर – ७१, ६०
पातूर – ६१, ५५
बाळापूर – ४६, ४०
खामगाव – ९१, ८०