अमरावती करिता निघालेल्या एसटी महामंडळच्या बसला अपघात; दोन महिला गंभीर
गडचिरोली(Gadchiroli):- नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन अहेरी वरून अमरावती करिता निघालेल्या एसटी महामंडळाच्या(ST Corporation) अहेरी आगाराच्या बसला अपघात झाला आहे. ही घटना लगाम ते आष्टी रस्त्यावरील धनुर जवळच्या वन विभागाच्या(Forest Department) नाक्या जवळ सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात वाहकासह दोन महिला प्रवाशी गंभीर जखमी(seriously injured) झाल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे.
साईड देताना बाजूला खोल भाग असल्याने बस पलटली
प्राप्त माहितीनुसार अहेरी आगाराची एम एच-07 सी-9463 क्रमांकाची बस जवळपास 27 प्रवाशांना घेऊन सकाळी 8.30 वजता अमरावती करीता निघाली. अहेरी वरून वर्धा मार्गे ही बस अमरावती ला जाते. अहेरी वरून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील धनुर जवळच्या वनविभाग नाक्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना बाजूला खोल भाग असल्याने बस पलटली. या वाहनात चालक पी आर मेश्राम आणि वाहक डी एस मेश्राम होते. च्या सोबत जवळपास 27 प्रवासी या वाहनातून प्रवास करत होते. त्यातील वाहक डी एस मेश्राम आणि दोन महिला प्रवाशांना गंभीर दुखापत (serious injury) झाली असून त्यांना रुग्णवाहिकेने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospitals) उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. चेस म्हणजे या बस मध्ये वाहक असलेले डी एस मेश्राम यांची मुलगी सुद्धा प्रवासी म्हणून होती. तिला सुद्धा दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अहेरी आगाराचे व्यवस्थापक चंद्रभूषण घागरगुंडे यांनी पटनास्थळ घाटून परिस्थितीचा आढावा घेत उर्वरित प्रवाशांची हस्तेने विचारपूस करत इतर वाहनाने त्यांना समोर पाठविले आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी ठप्प झाली होती.