प्रवाशांच्या खिशाला कात्री सुटे पैसे देताना वाहकांची अडचण
वर्धा ( Wardha ) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महमंडळाच्या (MSRTC) वतीने एसटीच्या तिकीटांच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीने विविध ठिकाणच्या प्रवासाच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. महामंडळाच्या वतीने १५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. नवीन दरवाढ मध्यरात्रीपासून लागू करनण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला १४.९५ टक्के दरवाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे.
या दरवाढीवरून प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने तिकीटांच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून दरवाढ लागू झालेली आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वच ठिकाणी सकाळच्या सुमारास प्रवाशी बसमध्ये चढल्यानंतर त्यांना दरवाढ झालेली तिकीट मिळाली. दरवाढ पाहून अनेक प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रवाशांमध्ये याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही वर्षांच्या कालावधीनंतर महामंडळाकडून तिकीटांच्या (tickets from the corporation )दरात वाढ करण्यात आली आहे.
नवीन वर्षाची सुरूवात (MSRTC) महामंडळाच्या दरवाढीने झालेली आहे. त्यावरून प्रवाशांमध्ये मात्र संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अलिकडे बसमधील प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करताना दिसतात. त्यात महामंडळाकडून प्रवाशांकरिता विविध सवलतींच्या योजना राबविण्यात येत आहे. यातून प्रवाशांची संख्या वाढलेलीअसताना आता तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. ही दरवाढ खिशाला कात्री लावणारी असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटत आहे.
सुटे पैशांकरिता वाहकांसह प्रवाशांनाही नाहक त्रास
तिकीटांच्या दरात वाढ झाल्यानंतर अनेक प्रवासाच्या ठिकाणी सुट्यांवरून प्रश्न निर्माण झालेला आहे. समजा ९१ रुपयांचे तिकीट असल्यास प्रवाशांना नऊ रुपये सुटे पैसे कसे देणार, असा प्रश्न वाहकांपुढे निर्माण होत आहे. दुसरीकडे सुट्या पैशांचा प्रवाशांकडेही निर्माण होत आहे. नवीन दरवाढीत सुटे पैशांचा मोठा प्रश्न प्रवासी आणि वाहकांपुढे निर्माण होत आहे.