वाद विकोपाला गेल्याने, भलतेच काहीतरी घडले!
हिंगोली (Stabbing) : सेनगाव तालुक्यातील एका गावामध्ये पतीने पत्नीस (Husband Wife) जेवन वाढण्यास म्हटले, असता पत्नीने हातातील कांदा कापण्याच्या चाकुने (Knife) पतीच्या गुप्तांगावर वार करुन दुखापत केल्याने पत्नीवर गुन्हा नोंदविण्यात आला. संसारामध्ये पती-पत्नीत या नात्या कारणावरून नेहमीच खटके उडत असतात. परंतु हे वाद कधी कधी अधिक विकोपाला गेल्याने भलतेच काहीतरी घडते. त्यातील एक प्रकार म्हणजे सेनगाव पोलिस ठाणे (Sengaon Police Station) हद्दितील एका गावामध्ये घडला.
पत्नी विरूध्द गुन्हा दाखल!
7 मे रोजी एका गावातील 36 वर्षीय पतीने आपल्या घरी पत्नीच जेवण वाढण्याकरीता सांगितले असता जेवण वाढ असे का म्हणाले, या कारणावरून पत्नीने हातातील कांदा कापण्याच्या चाकुने पतीच्या गुप्तांगावर वार करून दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पतीने रुग्णालयात उपचार (Hospital Treatment) घेतल्यानंतर, 8 मे रोजी सेनगाव पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिल्याने पत्नी विरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.