Venkateswara Swamy Temple Incident:- तिरुमला टेकड्यांवरील भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरात (Venkateswara Swamy Temple) बुधवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सहा भाविकांचा मृत्यू (Death) झाला आणि डझनभर जखमी झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तिरुमला तिरुपती देवस्थानमचे अध्यक्ष बी.आर. नायडू म्हणाले की, एका मृतदेहाची ओळख पटली आहे. “एका डीएसपीने दरवाजे उघडले… आणि लगेचच सर्वजण पुढे सरकल्याने ही चेंगराचेंगरी झाली आणि सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
१० दिवसांच्या वैकुंठ द्वार दर्शनमसाठी देशभरातून शेकडो भाविक आले
“तिरुपतीतील विष्णू निवासमजवळ वैकुंठ द्वार दर्शनममध्ये जाताना झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू झाल्याने मला खूप दुःख झाले आहे,” असे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. टीटीडी अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, नायडू यांनी टेलिकॉन्फरन्स आयोजित करून मंदिर कर्मचाऱ्यांबद्दल असंतोष व्यक्त केला आणि अशी घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले. (मंदिर) प्रशासनामुळे हे घडले असा काही संशय आहे, असे त्यांनी सांगितले आणि जखमींना सांत्वन देण्यासाठी मुख्यमंत्री (Chief minister)गुरुवारी तिरुपतीला येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
टेलिकॉन्फरन्स आयोजित करून मंदिर कर्मचाऱ्यांबद्दल असंतोष व्यक्त
“मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत असे निर्देश दिले आहेत”, असे ते म्हणाले.“याला धडा म्हणून घेत, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे,” असे नायडू म्हणाले, मुख्यमंत्री गुरुवारी सानुग्रह अनुदान जाहीर करतील. चेंगराचेंगरीला दुर्दैवी ठरवत, टीटीडी बोर्ड सदस्य भानु प्रकाश यांनी या घटनेबद्दल श्रीवरी (भगवान वेंकटेश्वर स्वामी) भक्तांची क्षमा मागितली. काही त्रुटी होत्या आणि कठोर कारवाई केली जाईल परंतु गेलेले जीव परत आणता येणार नाहीत, असे ते म्हणाले. पोलिस कर्मचाऱ्यांनी काही महिला भाविकांना आणि जखमींना रुग्णवाहिकांमध्ये हलवताना सीपीआर (Cardiovascular control) दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.