हिंगोली (MLA Pankaja Munde) : विधानसभा निवडणूक निमित्ताने महायुतीचे उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ स्टार प्रचारक आमदार पंकजा मुंडे यांची शुक्रवारी सेनगावात तोफ धडधडणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस उरले आहेत. त्यामुळे अनेक राजकीय पक्षाचे नेते मंडळी उमेदवाराच्या प्रचाराला येत आहेत. त्याच निमित्ताने हिंगोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांच्या निवडणूक प्रचार निमित्ताने स्टार प्रचारक मधील आमदार पंकजा मुंडे (MLA Pankaja Munde) यांची सेन गावात आठ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता जाहीर सभा होणार आहे. नेते मंडळीपैकी पहिली जाहीर सभा होत असल्याने महायुतीचा उत्साह अधिक वाढला आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केले आहे.