शेतकरी बांधवांच्या वतीने खा. देशमुख यांना निवेदन
मानोरा (Cotton buying center) : तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी खा. संजय देशमुख यांची भेट घेऊन मानोरा येथे भारतीय कापूस निगम लिमिटेड सी सी आय मार्फत कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्यासाठी निवेदन दिले. जिल्हयातील इतर पाच तालुक्याच्या ठिकाणी (Cotton buying center) कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी सी सी आय मार्फत प्रक्रिया सुरु केलेली आहे, परंतु त्यामध्ये मानोरा तालुका वगळण्यात आला होता.
ही बाब शेतकऱ्यांनी खासदार महोदय यांच्या लक्षात आणून देताच खासदार महोदयांनी त्वरित या बाबीची दखल घेऊन सी सी आय च्या अधिकाऱ्याशी संपर्क करून मानोरा येथे सी सी आय मार्फत कापूस खरेदी सुरु करण्याचे निर्देश दिले. आणि मानोरा येथे (Cotton buying center) कापूस खरेदीचे केंद्र सुरु करण्यासाठी कार्यालयीन प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. निवेदन देतांना राजेंद्र पाटील म्हातारमारे, मोहन देशमुख, आनंदराव वजीर, गोपाल पत्रे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.