Badlapur :- बदलापूरमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आग लागल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये ही आग (Fire)लागली. या आगीत रेकॉर्डमधील कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. शॉर्टसर्किटमुळे (short circuit) ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे. या आगीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे रेकॉर्ड जळाल्याची भीती आहे.
Badlapur : बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात लागली आग
