या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी
मुंबई (Sujata Saunik) : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांची नियुक्ती झाली असून ,या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत . सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक यांना (State Chief Secretary) मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असून जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. रविवारी संध्याकाळी 5 वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर (Nitin Karir) यांच्याकडून त्यांनी मुख्य सचिव पदाची सूत्र हाती घेतले.
पती आणि पत्नी मुख्य सचिव
सुजाता सौनिक (Sujata Saunik) या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक (Manoj Saunik) यांच्या पत्नी आहेत. या आधी मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलेलं आहे . सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे राज्याच्या इतिहासात पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर यांचा कालावधी पुन्हा एकदा वाढवून देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण (Maharashtra State Govt) राज्य सरकारकडून तसे न करता सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सेवाज्येष्ठतेनुसार, 1987 च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, (Department of Revenue) महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (1988) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (1989) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते . त्यामध्ये सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
कोण आहेत सुजाता सौनिक?
सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड मध्ये झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलीय. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर देखील कारभार सांभाळला आहे. त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.