देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Chikhli Assembly Election) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीचा कार्यक्रम मा. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 च्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे घोषित केला आहे. राज्यात एकाच टप्प्यामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर मा. राज्य निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 23 चिखली व 24 सिंदखेड राजा या (Chikhli Assembly Election) विधानसभा मतदार संघाकरिता मा. निवडणूक निरिक्षक (सामान्य) (General Observer). नरेश झा, हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9226152955 असा आहे व त्यांचे संपर्क अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा हे असून मा.निरिक्षक यांचे निवासस्थान शासकीय विश्राम गृह, बुलढाणा येथे आहे.
विधानसभा निवडणूक 2024 च्या (Chikhli Assembly Election) अनुषंगाने 23 – चिखली व 24 सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाकरीता उपरोक्त नमुद.निरिक्षक हे जिल्हयामध्ये दाखल झालेले असून कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरीकांची काही तक्रार असल्यास वरील क्रमांकावर सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत संपर्क साधता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी, 23 चिखली व 24 सिंदखेड राजा यांनी कळविले आहे.