देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: State Employment Fair: महाराष्ट्रात आज एकाचवेळी तब्बल 10 हजारांची पदभरती…नियुक्तीपत्रे देऊन अभिनंदन
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsकरीअरमहाराष्ट्रमुंबईराजकारण

State Employment Fair: महाराष्ट्रात आज एकाचवेळी तब्बल 10 हजारांची पदभरती…नियुक्तीपत्रे देऊन अभिनंदन

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/04 at 6:06 PM
By Deshonnati Digital Published October 4, 2025
State Employment Fair

2026 या वर्षात सुद्धा मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार

राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (State Employment Fair) : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे, असे सांगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करून 2026 या वर्षात मोठ्या प्रमाणात (State Employment Fair) पदभरती करण्यात येणार आहे, असे (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. शासकीय सेवेत आज नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांनी लोकाभिमुख आणि पारदर्शी पद्धतीने आपले काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'राज्य रोजगार मेळावा – राज्यस्तरीय कार्यक्रम येथे अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेशांचे वितरण'.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री जयकुमार रावल, मंत्री छगन… pic.twitter.com/j1WoMUguCR

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 4, 2025

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील 10 हजार 309 उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील 10 हजार 309 उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरणाच्या राज्य रोजगार मेळाव्याच्या (State Employment Fair) राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा (विदर्भ व तापी व कोकण खोरे विकास महा.), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, आमदार परिणय फुके,आमदार अबु आझमी,आमदार मनोज जामसुतकर, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्यसचिव व्ही.राधा, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, कोकण विभागीय आयुक्त विजयकुमार सुर्यवंशी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी मान्यवर उपस्थित होते.

LIVE | 'अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेशांचे वितरण'

🕧 दु. १२.१६ वा. | ४-१०-२०२५📍यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.#Maharashtra #Mumbai #AppointmentLetters https://t.co/MDBTPFDuva

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2025

राज्य शासनाची संस्थात्मक बांधणी बळकट करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, राज्य शासन अधिक सक्षम आणि गतिशील करण्यासाठी शासनाने सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणांचे निराकरण तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पारदर्शक भरती प्रक्रिया (State Employment Fair) राबविण्यावर भर दिला आहे. आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करण्यासाठी अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून विविध राज्यांचा अभ्यास करून निर्णय घेणार आहोत. आतापर्यंत 80 टक्के अनुकंपा नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येतील. राज्याचे प्रशासन हे संस्थात्मकदृष्ट्या बळकट करण्याबरोबरच ते गतिशील, संवेदनशील आणि लोकाभिमुख करण्यास प्राधान्य दिले असून यासाठी 100 दिवसांचा आणि नंतर 150 दिवसांचा कार्यक्रम घेतला. यातून अनेक सुधारणा करता आल्या. अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सामान्य प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोठे बदल सुरू केले, असेही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री म्हणाले.

State Employment Fair

सेवा प्रवेश नियमांत सुधारणा आणि अनुकंपा तत्त्वाला न्याय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, अनेक विभागांचे सेवा प्रवेश नियम 50 वर्षे जुने होते. तंत्रज्ञानातील बदलांमुळे अगदी लिपिकापासून ते वरच्या स्तरापर्यंत पदांचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत, पण नियमांमध्ये बदल झाले नव्हते. रिक्त पदे भरण्यासाठी हे सेवा प्रवेश नियम बदलण्याचा प्रयत्न सुरू केला. (State Employment Fair) अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होत्या, अनेक पात्र कुटुंबे, ज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची मुले आणि पत्नी यांचा समावेश होता. याबाबतचे सर्व शासन निर्णय बदलून एक सुटसुटीत आणि सोपा शासन निर्णय तयार केला. अनुकंपा तत्वावर नोकरी देणे हे काही उपकार नाहीत, तर ती शासनाची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांच्या घरी एखादा अपघात झाल्यास, त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे, या भावनेतून आम्ही काम केले. याच बदलांमुळे आज 80% अनुकंपाच्या जागा भरल्या गेल्या आहेत, आणि उर्वरित 20% जागाही लवकरच भरल्या जातील असेही ते (CM Devendra Fadnavis) म्हणाले.

State Employment Fair

शहीद उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची कन्या अनुष्का प्रकाश मोरे हिला नियुक्ती

अनुकंपा यादीत आज शहीद उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची कन्या अनुष्का प्रकाश मोरे हिला नियुक्ती दिली आहे. 26/11/2008 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्याच्या मुलीला इतक्या वर्षांनी न्याय देऊ शकलो, हे महत्त्वाचे आहे. अनुष्का बी-फार्म असल्याने तिला ‘औषध निर्माता गट ब’ हे पद अनुकंपावर मिळणे नियमांमुळे कठीण होते, कारण ते पद एमपीएससीकडे होते. पण, आम्ही एमपीएससीला विशेष विनंती करून नियमात शिथिलता मिळवली आणि तिला न्याय दिला. अनुष्काला न्याय मिळवून दिल्याचा आम्हाला आनंद आहे, असे (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लिपिक संवर्गातील नियुक्त्याही एमपीएससीमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. (State Employment Fair) एखाद्या राज्यामध्ये जर भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसेल, तर मेहनत करणाऱ्यांवर मोठा अन्याय होतो. म्हणूनच, आयबीपीएस आणि टीसीएससारख्या चांगल्या संस्थांमार्फत परीक्षा घेऊन जवळपास 1 लाख लोकांना नियुक्त्या दिल्या आहेत, ज्यात 40 हजार पोलिसांची भरतीही समाविष्ट आहे. पुढील काळात सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करून आणि भरती प्रक्रियेची गती वाढवून नियुक्त्या दिल्या जातील, असेही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री म्हणाले.

State Employment Fair

शासकीय सेवेत आल्यानंतर तुम्ही लोकाभिमुखतेने आणि पारदर्शी पद्धतीने कारभार कराल. शासन आणि प्रशासन हे जनतेला सेवा देण्यासाठी निर्माण झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) दिलेल्या संविधानानुसार जनता मालक आहे, आणि आपण सर्वजण त्यांची सेवा करण्यासाठी नियुक्त केलेली व्यवस्था आहोत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी सेवेकरी म्हणून संवाद साधा असे आवाहन करून आपल्या कामातून तुमच्याकडे येणाऱ्या किमान १०% लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य फुलवू शकलात, तर त्यापेक्षा मोठे समाधान जीवनात दुसरे काही नसते. आपण सेवा करण्याकरता येथे आलेलो आहोत. हा सेवाभाव तुम्ही कायम ठेवल्यास, सरकारी सेवेत काम करताना मिळणारे मानसिक समाधान कोणत्याही पैशाशी तुलना न करता येणारे समाधान असेल असेही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकाचवेळी 10 हजारांची पदभरती हा ऐतिहासिक निर्णय : उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी १० हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याबद्दल अभिनंदन करत, हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की शासनाने अनुकंपा तत्त्वावरील सुमारे 80 टक्के प्रलंबित प्रकरणे निकाली काढली असून भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि वेग यावर विशेष भर देण्यात आला आहे. (State Employment Fair) शासनाने तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून अनेक कुटुंबांना दिलासा दिला आहे.

उपमुख्यमंत्री पवार (Ajit pawar) म्हणाले की, “प्रत्येक फाईल, प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक निर्णयामागे एक जिवंत कथा असते. त्यामुळे पारदर्शकता, जबाबदारी आणि निष्ठा हे तीन शब्द प्रत्येक कर्मचाऱ्याचे मार्गदर्शक असले पाहिजेत.” नवनियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांनी ई-गव्हर्नन्सचा वापर वाढवण्याचे, लोकाभिमुख कारभार करण्याचे आणि प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या “2047 पर्यंत विकसित भारत” या स्वप्नपूर्तीसाठी विकसित महाराष्ट्र घडवण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी 20 उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या (सेवा) अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांचा पदभरती प्रक्रिया गतीमान पध्दतीने राबविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले, आभार कोकण विभागीय आयुक्त विजयकुमार सुर्यवंशी यांनी मानले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्यात नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. राज्य शासनात नियुक्त होणाऱ्या एकूण 10,309 उमेदवारांपैकी सर्वाधिक 3,078 उमेदवार हे कोकण विभागातील असून, 2,597 हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात 1,674, नाशिक विभागात 1,250, तर मराठवाड्यातील 1,710 उमेदवार आहेत.

[ruby_related total=5 layout=5]

TAGGED: 10 thousand recruitment, ajit pawar, Amit Shah, bjp, CM Devendra Fadnavis, eknath shinde, Maharashtra CM, MLA Ambadas Danve, NCP, PM Narendra Modi, Shiv Sena, State Employment Fair, Uddhav Thackeray

वाचण्यासारखी बातमी

Barshitakali Election
विदर्भअकोलाराजकारण

Barshitakali Election: निवडणुकीच्या काळात पक्ष बदलून आलेल्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत

November 11, 2025
Risod Municipal Council Election
विदर्भराजकारणवाशिम

Risod Municipal Council Election: रिसोड नगरपरिषद निवडणूकीमध्ये महायुतीत ‘नॉट गुड’, एकला चला ची भूमिका

November 11, 2025
Hingoli Election
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Election: बुथ निहाय मतदार यादी संकेतस्थळावर सापडेना

November 11, 2025
Hingoli Election
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Election: हिंगोली जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही एकही दाखल नाही नामनिर्देशन अर्ज

November 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?