हिंगोली(Hingoli) :- राज्य उत्पादन शुल्क विभागा हिंगोलीच्या वतीने जिल्ह्यात अवैध मद्य विक्री(State Excise Department strikes) व वाहतुक विरोधात धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. ११ ठिकाणी अवैध दारु विक्रीवर छापे टाकुन ३० हजार ५३० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन ११ जणा विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
११ जणावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल
जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, हातभट्टी (hand furnace)निर्मिती करुन वाहतुक करत हातभट्टीच्या दारुची विक्री केल्या जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग हिंगोलीला कळाल्यानंतर २९ व ३० जून दरम्यान जिल्ह्यातील गोरेगाव, कोळसा, कुरुंदा, आखाडा बाळापुर, सुकळी वीर, चोंडी तांडा, परिसरात अवैध विक्री होत असल्याने या अवैध दारु विक्रीवर छापे टाकण्यात आले. देशी दारुचे ४८.९६ब.लि, विदेशी दारु ८.२८ ब.लि व हातभट्टी २६ लिटर असा एकुण ३० हजार ५३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आणि ११ आरोपी विरुद्ध दारु बंदी कायदा कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
हातभट्टी व विदेशी दारे २६ लिटरचा मुद्देमाल जप्त
२९ व ३० जून या दोन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागिय उपाआयुक्त (Divisional Deputy Commissioner)नांदेड विभागाचे डॉ. बी.एच तडवी यांच्या निर्देशना प्रमाणे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम.सी मातकर, निरीक्षक ए.एम. पठाण, हिंगोली व परभणी विभागाचे पथक निरीक्षक जगताप, विभागीय भरारी पथक, नांदेड विभागाचे(Nanded Division) दुय्यम निरीक्षक के.जी. पुरी, पी.बी. गोणाकर वसमत जवान के.एल. कांबळे, सागर मोगले, राहुल चव्हाण, दशरथ राठोड, पंडित तायडे, कच्छवे, वाघमारे यांनी ही कारवाई करुन मुद्देमाल जप्त केला.