दिग्रस आर्णी सह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी धाडी
सात आरोपी जेरबंद तर 32 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुसद (Illegal liquor Case) : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक नितीन शेंडे यांच्या आदेशान्वये आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुसद तालुक्यामध्ये अवैध देशी विदेशी व गावठी दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग पुसद बीट एक व दोन तर दिग्रस आर्णी मध्ये मोहीम रविण्यात आली. तर या (Illegal liquor Case) मोहिमेमध्ये सात आरोपी जेरबंद करण्यात आले तर 32 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई दि. 8 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. यामध्ये तालुक्यातील धुंदी या कारवाई मध्ये हातभट्टी दारू540 लिटर,रसायन6396 लिटर तसेच ताडी 70 लिटर असा एकूण 32 लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Illegal liquor Case) सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी एस वाघ पुसद, दुय्यम सहाय्यक निरीक्षक अनिल एन पिकले, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रमेश राठोड, शिपाई मानकर, रामटेके, बोंबले व महिला शिपाई गटलेवार यांनी पार पाडली.