पायाभूत सुविधा विकासासाठी बँकाकडून सर्वोत्तम सहकार्य
मुंबई (CM Devendra Fadnavis) : महाराष्ट्र प्रगतीशिल राज्य असून राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व (Reserve Bank) बँकाचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे. राज्यातील रस्त्यांची गरज लक्षात घेवून रस्ते विकासासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. समृध्दी महामार्गाच्या यशस्वी कामामुळे आज अनेक बँका राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी पुढे येत आहेत. राज्य शासनाचे सर्वोत्तम काम हीच सर्वात मोठी आश्वासक बाब आहे. महाराष्ट्र शासन म्हणजेच बँकासाठी आश्वासक असून बँकाकडून राज्य शासनाला यापुढे असेच सर्वोत्तम सहकार्य मिळेल, अशी आशा (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत सर्व बँकाच्या सहकार्याने राज्यात २५ कोटी ८७५ कोटींचे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे अत्यंत चांगली बाब आहे. राज्यातील पायाभूत सुविधांसाठी या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्यात १ लाख कोटी रूपयांची कामे पूर्ण होतील हे सांगताना मला आनंद होत आहे. रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करूनच राज्य विविध बँकाकडून नियमित कर्ज घेवून त्याची परतफेड करत असते. राज्यातील रस्ते चांगल्या दर्जाचे होण्यासाठी राज्य शासन कोणाच्याही शिफारशीशिवाय प्रत्यक्ष रस्त्यांची गरज कोणत्या भागात आहे हे लक्षात घेवून रस्ते विकासासाठी नियोजन करून उत्तम दर्जाचे रस्ते देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्व बँकानी राज्यातील पायाभूत सुविधांसाठी राज्य शासन करत असलेले नियोजन व अंमलबजावणी याची माहिती जरूर घ्यावी, अशा सूचना (CM Devendra Fadnavis) त्यांनी यावेळी केल्या.
राज्यातील पायाभूत सुविधा बळकटीकरणावर भर: शिवेंद्रराजे भोसले
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. सुधारित हॅम पहिल्या टप्प्यातील कामे प्रगतीपथावर आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचा महत्वकांक्षी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एमएसआयडीसी मार्फत ३४ जिल्ह्यात जवळजवळ ५९७० किमी लांबीचे रस्ते सुरू करण्याचे प्रस्तावित होते ते सर्व कामे झाली आहेत उद्यीष्टापेक्षा जास्त कामे सुरू केली असून केले असून, ते लवकर पूर्ण करण्यात येतील असेही ते (Shivendraraj Bhosale) म्हणाले.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित (Brijesh Dixi)t म्हणाले की, शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पुणे ते शिरूर उडाणपूल काम, तळेगाव- चाकण -शिक्रापूर हायवे, हडपसर यवत हायवे या कामांना आवश्यक असलेली मंत्रीमडळाची मान्यता घेवून नॅशनल हायवेची कामे गतीने पूर्ण करण्यात येतील, असे (Brijesh Dixit) त्यांनी सांगितले.




