लातूर(Latur):- ‘कटेंगे तो बटेंगे’, या घोषणेनंतर महायुतीच्या सरकारने राज्यातील वक्त बोर्ड बळकटीकरणासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने छत्रपती संभाजी नगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड (Waqf Board) अधिक बळकट करण्यासाठी दहा कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला तसेच त्याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या (State Govt) अल्पसंख्यांक विकास विभागाने गुरुवारी काढला.
तात्काळ दिला दहा कोटींचा निधी
वर्ष २०२४-२५ मध्ये अनुदान वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभागाने हा आदेश काढला आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण रु.२० कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधून रु.२ कोटी इतके अनुदान यापूर्वीच महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळास वितरित करण्यात आले आहे. आता या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळासाठी आणखी रु.१०.०० कोटी इतके अनुदान वितरित करण्यात आले आहेत. सरकारकडून वक्फ बोर्डाला आणखी ८ कोटी रुपये वितरित होणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, यांनी सदर निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तसेच महालेखाकार कार्यालयास सादर करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.