नवी दिल्ली (heat wave) : सध्या संपूर्ण भारत उष्णतेच्या विळख्यात (heat wave) सापडला आहे. लोकांना दिवसा घराबाहेर पडणे कठीण होत आहे. तेलंगणात 17 मे पर्यंत उष्माघाताचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. 13 मे रोजी होणाऱ्या (LokSabha Elections) लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी मतदानाची वेळ वाढवली आहे. (Election Commission) निवडणूक आयोगाने आता मतदानाची वेळ बदलून सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी केली आहे. जी आतापर्यंत सकाळी 7 ते सायंकाळी 5 अशी होती. तेलंगणातील 20 जिल्ह्यांमध्ये पारा अजूनही 45 अंशांच्या आसपास आहे. हवामान खात्याकडून याबाबत एक सूचना जारी करण्यात आली आहे.
आता मतदानासाठी आणखी एक तासाची वेळ
13 मे रोजी तेलंगणातील करीमनगर, निजामाबाद, झहीराबाद, मेडक, मलकाजगिरी, सिकंदराबाद, हैदराबाद, चेवेल्ला, महबूबनगर, नागरकुर्नूल (SC), नलगोंडा आणि भोंगीर (LokSabha Elections) लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. त्याठिकाणी मतदानासाठी आणखी एक तास जास्त देण्यात येणार आहे.
तेलंगणामध्ये पारा 46 अंशांवर
तेलंगणा सध्या प्रचंड उष्णतेने (heat wave) होरपळत असल्याची माहिती आहे. नलगोंडामध्ये पारा 46.6 अंशांवर पोहोचला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट (Red Alert) कायम आहे. हैदराबादसह अनेक जिल्ह्यांसाठी ॲडव्हायझरी लागू करण्यात आली आहे. 15 मे पर्यंत देशातील अनेक भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
उष्णतेच्या लाटेसाठी रेड अलर्ट जारी
- सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत विनाकारण घराबाहेर पडू नका.
– तुम्ही बाहेर जात असाल किंवा प्रवास करत असाल तर, सतत पाणी प्या.
– ORS आणि घरगुती पेये वापरा.
– स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी खा.
– बाहेर जाताना नेहमी डोके झाकून ठेवा.
– डोळ्यांवर चष्मा लावा.
– फळे आणि भाज्या खा.
– उन्हाळ्यात (heat wave) हलक्या रंगाचे आणि सुती कपडे घाला.
– बाहेरच्या वस्तू खाणे टाळा.
– उघडे अन्न किंवा उघडे पाणी पिऊ नका.
– घरातून बाहेर पडताना छत्रीचा वापर करा.
– तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.