रिसोड (Teniquite Championship) : दि.६ नोंव्हें ते १० नोव्हें २०२४ या कालावधीत, पंढरपूर येथे आयोजित राज्यस्तरीय टेनीक्वाईट स्पर्धेत १९ वर्षे वयोगटाच्या आतील मुलींचा वाशीम जिल्हाच्या संघ विजयी झाला असून चेन्नई येथे होणा-या राष्ट्रीय चॅपीयनशीप स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे.
विजयी संघामध्ये श्री सखाराम महाराज विद्यालय, लोणी बु. येथिल कु. कोमल गणेश बोडखे, कु. अनुजा केशव गिरी, कु. सृष्टी सुभाष बोडखे व कारंजा येथिल कु. अक्षरा नेटके, कु. अकांक्षा नेटके व संचिता राउत हयांचा संघामध्ये समावेश होता. तसेच मिक्स दुहेरी संघामध्ये ओंकारेश्वर विद्यालय, जयपुर ता. जि. वाशीम चा विद्यार्थी भोला राठोड श्री सखाराम महाराज विद्यालय, लोणी बु. ची कु. अनुजा केशव गिरी या दोघानी विजतेपद पटकावले. वाशीम जिल्हा टेनिक्वाईट संघटनेचे सचिव श्री संजय शिंदे सर यांच्या नेतृत्वात व प्रशिक्षक तेजेश राउत व अक्षय गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.
तर संघ व्यवस्थापक म्हणून रामदास बलाळ यांचे सहकार्य लाभले. या यशस्वी विद्यार्थ्याचे श्री सखाराम महाराज विद्यालयाचे अध्यक्ष श्री गोविंद जोशी, सचीव डॉ. सखाराम जोशी व प्रार्चाय कल्याण महाराज जोशी तसेच शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले. परिसरात विजेत्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.आपल्या यशाचे श्रेय आई – वडील प्रशिक्षक व शाळेच्या मुख्याध्यापकांना देतात.