कारंजा(Washim):- कारंजा तालुक्यातील ढंगारखेड येथील प्रगतिशील युवा शेतकरी तथा युवा कृषी उद्योजक (Agricultural entrepreneur) स्वप्निल लव्हाळे यांना 21 मे रोजी त्यांच्या शेताच्या बांधावर राज्यस्तरीय राजीव गांधी कृषि रत्न (Agricultural gem) पुरस्कार बहाल करण्यात आला.
शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार
कमी खर्चाची शेती करून तसेच नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शेतकऱ्यांना जगण्याचे बळ मिळावे हीच या मागची माफक अपेक्षा असून सन्मान चिन्ह, राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची प्रतिमा, प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 21 मे रोजी त्यांच्या शेताच्या बांधावर शेतकऱ्यांच्या भरगच्च उपस्थितीमध्ये त्यांना राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रगतशील शेतकऱ्यांचा बांधावरचा सन्मान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मनोबल उंचवणारा ठरेल व ही प्रेरणा घेऊन शेतकरी अधिक उत्पादन वाढीची कास धरेल, असे मत यावेळी बोलताना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान(Institute of Agricultural Sciences) अमरावतीचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी व्यक्त केले.
“एक गाव एक उद्योग,”या संकल्पनेकडे गावकरी व शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे- सौ. पौर्णिमाताई सवाई
तर “एक गाव एक उद्योग,”या संकल्पनेकडे गावकरी व शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे असे ग्रामगीताचार्य सौ पौर्णिमाताई सवाई यांनी सांगितले. बांधावरील या पुरस्कार वितरण सोहळ्यास पौर्णिमाताई सवाई, प्रकाश साबळे, डॉ. दिलीप काळे, डॉ. अनिल ठाकरे, भैयासाहेब निचळ, अविनाश पांडे, सरपंच धनराज खिराडे, रवींद्र जटाळे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे, पंचायत समिती सदस्य मयूर मस्के, लव्हाळे, निशिकांत तायडे, अजय ढोक, राहुल तायडे, अनुला खान, निलेश उबाड, सोमेश गावंडे,अक्षय साबळे व अतुल लव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.ता.प्र