सायंकाळी ७ वाजता मानोरा येथे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
मानोरा (Chandrasekhar Bawankule) : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) शुक्रवार दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी वाशीम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व भाजपा पदाधिकारी त्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहतील.
सकाळी 11.00 वा. रिसोड येथून ते (Chandrasekhar Bawankule) जिल्हा प्रवासाला सुरुवात करतील. येथील जी.बी. लॉन येथे रिसोड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी 03.00 वा. वाशीम शहरातील परशुराम भवन, जुनी नगर पालिका रोड, आंबेडकर मार्ग येथे वाशीम विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ७ वाजता मानोरा येथील ठाकरे पॅलेस, लालमाती, मंगरूळपीर रोड येथे व कारंजा लाड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. अशी माहिती भाजपा पार्टी मानोरा तालुक्याच्या वतीने देण्यात आली आहे.