देगलूर आगारच्या भंगार बस कधी होणार दुरूस्त!
नांदेड (State Transport Board) : नांदेड जिल्ह्यातील राज्य परिवहन मंडळाच्या (State Transport Board) अनेक बसगाड्यांची अत्यंता दुरवस्था झाली असून, याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. रविवारी नांदेडहून देगलूरकडे जाणाऱ्या देगलूर आगाराच्या एका बसला गळती लागल्यामुळे प्रवाशांना (Passengers) मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस!
सुखद आणी आरामदायी प्रवास म्हणून शेकडो प्रवासी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करीत असतात. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अशातच एसटी महामंडळाच्या (ST Corporation) अनेक बसगाड्यांतून पाणी गळत असल्याच्या घटना समोर येत आहेत. रविवारी नांदेड बस स्थानकातून देगलूरकडे निघालेल्या देगलूर आगाराच्या बस क्रमांक एमएच २० बीएल ३५२२ या बसच्या छताला अनेक ठिकाणी गळती लागली होती. यामुळे प्रवाशांच्या अनेक सीट ओल्या झाल्या होत्या. ओल्या सीटवर बसूनच प्रवाशांना प्रवास करावा लागला. अनेक प्रवाशांच्या अंगावरही पाणी पडत असल्यामुळे रविवारी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी!
देगलूर आगार प्रशासनाच्या (Agar Administration) दुर्लक्षामुळेच बसची अशी अवस्था झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. बसच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.या प्रकारामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रशासनाने (Administration) या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी बसमधील प्रवाशी साईनाथ पाकलवाड यांनी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.याकडे आगार प्रमुख लक्ष देतील का हा आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


