रिसोड (MLA Bhavna Gawli) : राज्य सरकारने अनेक विकासात्मक कामे करून सर्वसामान्य जनतेस शेतकरी महिलांना न्याय मिळवून दिल्याने महायुतीचे विकासात्मक रिपोर्ट कार्डच महायुतीच्या उमेदवारांना विजयी करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या आमदार तथा रिसोड मालेगाव मतदार संघाच्या प्रभारी भावनाताई गवळी (MLA Bhavna Gawli) यांनी केले. आमदार भावनाताई गवळी या रिसोड येथील डॉ तिवारी यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या 18 ऑक्टोंबर 2024 च्या पत्रकार परिषदेत केले.
पुढे बोलताना त्या (MLA Bhavna Gawli) म्हणाल्या की, महायुती सरकारने 2.5 वर्षात अनेक विकासात्मक कामे करून बेरोजगार शेतकरी सर्वसामान्य नागरिक व महिलांना विकासाच्या मार्गावर त्यांचा विकास केला. राज्य सरकारने गरिबांसाठी घरे, शबरी आदिवासी घरकुल योजना, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी, स्वयंसहायता बचत गटांना मदत, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, रोजगार मिळावे तसेच महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना तसेच महाराष्ट्रातील सर्व गरजू मुलींना उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, युवकांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ कृषी सेवकांच्या मानधनात वाढ तसेच ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजना, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला.
आरोग्यदायी योजना, उद्योगधंदे, शहरात व ग्रामीण भागात पायाभूत विकासात्मक योजना राबून शहराचा विकास केला तसेच सांस्कृतिक व क्रीडा मध्ये अनेक बदल करून संस्कृती व क्रीडा प्रेमींना प्राधान्य दिले. यासारख्या विविध कल्याणकारी योजना माहितीच्या माध्यमातून राबवण्यात आले असून ज्या विकासात्मक कामाला दहा वर्षे लागतात ती फक्त अडीच वर्षात कामे पूर्ण करून सर्वसामान्य जनतेच्या तसेच तळागाळातील नागरिकांच्या मनात महायुतीने आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केल्याने आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळणार असल्याचा विश्वास विधान परिषदेचे आ भावनाताई गवळी यांनी व्यक्त केला. माणसाचे मन मोठे असले तर माणूस राजकारणात मोठा होतो तसेच मतदारसंघावर हक्क मागण्याचा हा सर्वांना अधिकार दिला असून आम्हीही रिसोड मालेगाव मतदार संघावर दावा केला असून रिसोड मालेगाव मतदार संघ हा वरिष्ठ स्तरावरून कोणाला सोडला जातो हे महत्त्वाचे असून वरिष्ठ स्तरावरून महायुतीच्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी दिल्यास त्या उमेदवाराचे आम्ही मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता सर्व शक्ती पणाला लावून प्रचार करून महायुतीच्या उमेदवाराला निश्चितपणे विजयी करू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पत्रकार परिषदेला माजी आमदार विजयराव जाधव, जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे, उपजिल्हाप्रमुख सुनील कायंदे भागवत गवळी (MLA Bhavna Gawli), डॉ. विजयप्रसाद तिवारी, मंचकराव देशमुख, शहराध्यक्ष अरुण मगर, गजानन अवताडे महायुतीचे तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. महायुतीचे एडवोकेट नकुल देशमुख यांना निमंत्रण नव्हते (आज महायुतीच्या वतीने महायुती रिपोर्ट कार्ड संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते परंतु या पत्रकार परिषदेला रिसोड मालेगाव विधानसभा प्रमुख एडवोकेट नकुल देशमुख यांना निमंत्रण नसल्याने ते उपस्थित नसल्याचे कळते. रिसोड मालेगाव मतदार संघात गटबाजी असल्याचे सर्वश्रुत आहे. निमंत्रणाबाबत अडवोकेट नकुल देशमुख यांना विचारले असता मला या पत्रकार परिषदे संदर्भात काही माहिती नसल्याचे सांगितल्याने वर्तुळात शंका कुशंका वर्तवली जात आहे.
उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींना की जिल्हाध्यक्षांना रिसोड मालेगाव मतदार संघात उमेदवारीवरून महायुतीमध्ये सडावड निर्माण झाली असून हा मतदारसंघ आमच्याच वाट्याला येणार असे प्रत्येक जबाबदार पदाधिकारी वक्तव्य करीत असून आज रिसोड मालेगाव मतदार संघातील उमेदवारी शिवसेनेच्या आमदार भावनाताई गवळी यांना निश्चित झाल्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव ठाकरे व तालुका अध्यक्ष शिवाजी खानजोडे यांनी प्रसार माध्यमावर व्हायरल करून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये भावनाताई गवळी यांना विचारले असता त्यांनी ही निवड अफवा असून यावर कोणी विश्वास ठेवू नका असे सांगितले. त्यांनी व्हायरल केलेल्या सोशल मीडियावर उमेदवारी देण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींना जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांना सर्वसामान्य जनतेसह राजकीय वर्तुळातील जाणकारांना पडला आहे.