धनगर समाजाच्या वतीने गाडगेनगर पोलिसांना निवेदन
अमरावती (Dhangar Samaj) : धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करून धनगर समाजाच्या (Dhangar Samaj) भावना दुखाविणाऱ्या त्या व्यक्तीविरोधात कठोर करावाई करा, या मागणीकरिता गाडगेनगर पोलीस स्टेशनचे (Gadgenagar Police) पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून राज्याच्या पोलीस विभागाला धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सदर व्यक्तीविरोधात कडक कारवाईची मागणी
पुणे येथील रहिवासी असलेल्या सुनील उभे नामक व्यक्तीने पुण्यश्लोक वीर अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केले आहे. यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असून राज्यभर याचे पडसाद उमटत आहे. जिल्ह्यात देखील (Dhangar Samaj) धनगर समाजाच्या वतीने याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी (Dhangar Samaj) धनगर समाजाचे वतीने गाडगेनगर पोलीस (Gadgenagar Police) स्टेशनला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात अॅड. अचल देविदास कोल्हे, धनश्याम बोबडे, माधव अवघड, रोशन गोहत्रे, रमण ईसळ, विशाल नवरे, कुणाल गोटे, भूषण गोहत्रे यांचा सहभाग होता.