चिखली/बुलडाणा (Ahlyabai Holkar) : तालुक्यातील रोहडा या गावात दि. २६ मे रोजी अहल्याबाई होळकर (Ahlyabai Holkar) यांचा पुतळा कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी कोणाचीही परवानगी न घेता, अनधिकृतपणे उभारल्याने रामकृष्ण गोविदा सोरमारे वय ५५ वर्ष रा. रोहडा यांच्या तक्रारी वरुन अंढेरा पोलिसांनी (Andhera Police) अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रोहडा गावात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहडा या गावामध्ये धनगर समाज बांधवांची ५०० ते ६०० लोकसंख्या आहे. अशा या गावामध्ये कोणीतरी अज्ञायत आरोपियांनी कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर (Ahlyabai Holkar) याचा विनापरवाना अनिधिकृतपणे पूर्णकृती पुतळा बसविलेला आहे. या घटनेची माहिती अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांना लागताच तात्काळ पोलीस कर्मचारी घेवून घटनास्थळी धाव घेतली. (Andhera Police) गावात पोलिसांचा बंदोबस्त पाहून मोठया संख्येने गावकरी गोळा झाले.
पोलिसांनी पुतळा (Ahlyabai Holkar) कोणत्या व्यक्तीने बसविला असे विचारले असता त्यावर कोणत्याही व्यक्तीने होकार दिला नाही. आणि कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे पुतळ्याची विटंबना होवू नये, म्हणुन ठाणेदार यांनी रामकृष्ण गोविदा सोरमारे वय ५५ वर्ष रा. रोहडा यांच्या तक्रारी वरुण डायरी अंमलदार विजय जाधव यांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द कलम ४४७ भादवी ,सहकलम ११ महाराष्ट्र पुतळयाच्या पवित्र भगास प्रतिबध अधिनियम १९९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत (Andhera Police) अंढेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी परिस्थितीची पाहणी करून गावात शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार कैलास उगले करीत आहेत.