चिखली (Buldhana) :- मिळालेल्या गुपीत माहितीनुसार अंढेरा पोलीसांनी अवैध धंद्यांचे स्टिंग ऑपरेशन केले असता एकाच दिवशी सात गावामध्ये दारू, वरली, जुगार खेळणाऱ्या आरोपींना पकडुन त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले .ही घटना १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.
आरोपींना पकडुन त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल
अंढेरा पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार दिनांक १२ सप्टेंबर रोजी पोलीस ठाणे अंढेरा हद्दीत अवैध धंद्याबाबत (Illegal business) गोपनीय बातमी दारामार्फत माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा व ठाणेदार, पोलीस स्टेशन अंढेरा यांनी संयुक्त पथके स्थापन करुन पोलीस स्टेशन अंढेरा हद्दीतील शेळगाव आटोळ येथे हातभट्टीची बांधणी करुन हातभट्टीची दारु गाळणाऱ्या व्यक्तीवर दोन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी व्यक्ती नामे सुभाष रामराव मोरे रा शेळगाव आटोळ याचेकडुन हातभट्टी दारु, मोहा गुळ मिश्रीत पाणी सडवा असा एकुण १६४००/- रु माल जप्त करण्यात आला. शेळगाव आटोळ येथे हातभट्टीची बांधणी करुन हातभट्टीची दारु गाळणान्या इसमावर दोन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी व्यक्ती नामे गजानन किसन कळसकर रा शेळगाव आटोळ याचेकडुन हातभट्टी दारु, मोहा गुळ मिश्रीत पाणी सहवा असा एकुण ११४००/- रु. माल जप्त करण्यात आला. शिवणी आरमाळ शिवारात येथे चालणाऱ्या जुगारावर दोन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी पैशावर जुगार खेळवणा-या दिगंबर आत्माराम इंगळे रा मनुबाई यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन वरली मटका आकडे लिहीलेल्या चिठ्या व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
मटका आकडे लिहीलेल्या चिठ्या व रोख रक्कम जप्त
शेळगाव आटोळ येथे चालणाऱ्या जुगारावर दोन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी पैशावर जुगार खेळवणा-या मनोहर धर्मा बोर्डे रा शेळगाव आटोळ यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन वरली मटका आकडे लिहीलेल्या चिठ्या व रोख रक्कम जप्त करण्यात आली. देऊळगाव धुबे येथे अवैधरित्या दारुची चोरटी विक्री करणान्या व्यक्तीवर दोन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी व्यक्ती नामे भगवान नामदेव काळे रा देऊळगाव घुबे याचेकडुन २८ नग देशी दारुच्या शिश्या जप्त करण्यात आल्या. नवीन मंडपगाव येथे अवैधरित्या दारुची चोरटी विक्री करणाऱ्या इसमावर दोन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नागे उचला विष्णु बर्डे वय ४४ वर्ष रा नवीन मंडपगाव याचेकडुन ०५ नग देशी दारुच्या शिश्या जप्त करण्यात आल्या. शेळगाव आटोळ येथे अवैधरित्या दारुची चोरटी विक्री करणाऱ्या इसमावर दोन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे सत्यवान सर्जेराव जाधव रा शेळगाव आटोळ याचेकडुन १४ नग देशी दारुच्या शिश्या जप्त करण्यात आल्या.मेरा बु येथे चालणाऱ्या जुगारावर दोन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी पैशावर जुगार खेळवणा-या ज्ञानेश्वर आत्मारा तोंडे रा मेरा बु यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन वरली मटका आकडे लिहीलेल्या चिठ्या व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
वेगवेगळया ठिकाणी जुगार खेळण्याविरुद्ध व पाच अवैध दारु विक्रेत्याविरुद्ध कार्यवाही
अशा प्रकारे छापे मारुन वेगवेगळया ठिकाणी जुगार खेळण्याविरुद्ध व पाच अवैध दारु (Illegal liquor) विक्रेत्याविरुद्ध कार्यवाही करुन पोलीस स्टेशन, अंढेरा येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक बुलढाणा, अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती मनिषा कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी देउळगाव राजा, सपोनि विकास पाटील ठाणेदार अंढेरा, पोउपनि सुरेश जारवाल, ग्रेड पोउपनि गजानन वाघ, सफी गणेश देढे पोहेकों, गोरख राठोड, कैलास उगले, सिध्दार्थ सोनकांबळे, रामेश्वर आंधळे, भरत पोफळे , भागवत गिरी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोउपनि राठोड पो का आघाव यांनी केली.