Stock Market: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 50 144.95 अंकांनी किंवा 0.6 टक्क्यांनी वाढून 24,276.05 वर बंद झाला. भारतीय शेअर बाजारांनी सुरुवातीच्या व्यवहारातील घसरणीतून बाहेर पडून सोमवारी चांगली सुधारणा केली. BSE सेन्सेक्स (Sensex) सुमारे 445 अंकांनी वाढला आणि पुन्हा एकदा 80 हजारांच्या पुढे गेला. निफ्टी 50 मध्ये वाढ दिसून आली.
BSE चा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स 445 .29 अंकांच्या किंवा ०.५६ टक्क्यांच्या वाढीसह ८०,२४८.०८ वर बंद झाला. तत्पूर्वी, सुरुवातीच्या व्यवहारात निर्देशांक 493.84 अंकांनी घसरून 79,308.95 अंकांवर आला. आज सेन्सेक्सने 80,337.82 ची उंची गाठली होती.
दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 50 144.95 अंकांनी किंवा 0.6 टक्क्यांनी मजबूत होऊन 24,276.05 वर बंद झाला. आज निफ्टीने 24,008.65 आणि 24,301.70 च्या रेंजमध्ये व्यवहार केले.
सेन्सेक्स टॉप गेनर्स
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 21 समभाग हिरव्या रंगात बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा आणि टायटन हे सेन्सेक्समध्ये टॉप-5 वाढले. याशिवाय मारुती, एमअँडएम, सन फार्मा, टाटा स्टील, रिलायन्स, एचसीएल टेक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि आयटीसी यांचे शेअर्सही वधारले. आहेत.
सेन्सेक्स टॉप लूजर्स
दुसरीकडे, सेन्सेक्समधील 30 पैकी 9 समभाग लाल रंगात बंद झाले. एनटीपीसी, कोटक बँक, एचयूएल, इंडसइंड बँक आणि पॉवर ग्रिड हे सेन्सेक्समधील टॉप 5 नुकसानीत होते. याशिवाय एल अँड टी, एसबीआय, एशियन पेंट्स आणि टीसीएसचे शेअर्सही तोट्यात राहिले.