मुंबई (stock market) : आज सकाळी जोरदार सुरुवात झालेला देशांतर्गत शेअर बाजार (stock market) शुक्रवारी मोठ्या घसरणीसह बंद झाला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स 732.96 (०.98%) अंकांनी घसरला आणि73,878.15 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 172.33 (0.76%) अंकांनी घसरला आणि 22,475.85 वर बंद झाला. आज सकाळी मजबूत दिसणारे (Sensex) सेन्सेक्स आणि निफ्टी त्यांच्या वरच्या स्तरावरून घसरले. या वेळात सेन्सेक्स 1130 अंकांनी घसरून 73,481 वर तर निफ्टी 296 अंकांनी घसरून 22,351 वर बंद झाला.
बाजारातील विक्रीदरम्यान, बीएसईचे सर्व 19 क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात व्यवहार करताना दिसले. (stock market) बाजारातील विक्रीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 404.48 लाख कोटी रुपयांवर घसरले. भारती एअरटेल, रिलायन्स, एल अँड टी, मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया आणि टाटा मोटर्सचे समभाग दुपारच्या सत्रात सर्वाधिक 3.37% पर्यंत घसरले. (Sensex) सेन्सेक्समध्ये बजाज ट्विन्सचे शेअर्स 1.8 टक्क्यांपर्यंत वाढले. (stock market) बाजारातील चढउतारांशी संबंधित इंडिया VIX ने 11.6% ने 15.01 च्या पातळीवर झेप घेतली.