हिंगोली (Hingoli Crime Branch) : जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र फिरवून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला दोन मोटरसायकल सह पकडले.
वसमत शहरातील युनियन बँकेच्या समोर 5 सप्टेंबरला मोटरसायकल चोरीची घटना घडली होती. तसेच कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील बोथी येथून सुद्धा 23 ऑगस्टला एक मोटरसायकल चोरीला गेली होती. त्या (Hingoli Crime Branch) अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून चोरट्याचा शोध घेत होते यामध्ये अरुण संजय पवार राहणार महात्मा फुले नगर परभणी हा मोटरसायकल चोरणारा सराईत गुन्हेगार असल्याची खात्री पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून चोरीतील मोटरसायकल क्रमांक एम एच 38 के 0865 व मोटरसायकल क्रमांक एम एच 38 क्यु 8667 अशा दोन मोटरसायकल एक लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या (Hingoli Crime Branch) चोरट्याकडून अन्य ठिकाणच्या मोटरसायकल चोरीची गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखालीसहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे भुजंग कोकरे, गजानन पोकळे, शिवाजी जालमिरे, आकाश टापरे, साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गोरे यांच्या पथकाने केली आहे.
