मानोरा(Washim):- मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माहुली येथील अवैध धंदे (Illegal business) व मद्य विक्री बंद करावी असे निवेदन दि. २४ सप्टेंबर रोजी ठाणेदार प्रविण शिंदे यांना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सत्यपाल राठोड व महिलांनी दिले आहे.
तंटामुक्त समिती व महिलांची एकमुखी मागणी
माहुली हे गाव मानोरा पोलीस स्टेशन पासून ६ किलो मीटर अंतरावर मानोरा – दिग्रस रोडवर आहे. या गावात काही वर्षांपासून बेकायदा मटका, जुगार, पत्ते, देशी व विदेशी दारू विक्री राजरोसपणे पान पट्टी, किराणा व गाड्यावर खुलेआम सुरू आहे. यापायी गावातील बहुतांश लोकांचे संसार उघड्यावर आले आहे. गावात अल्पवयीन शाळकरी मुले दारूच्या व्यसनाधीन होत आहे. गावातील अवैध धंदे बंद होणे संदर्भात ग्राम पंचायतने ठराव पारित केला आहे. गावात गुन्हेगारी(criminality) प्रवृत्ती वाढू नये. यासाठी अवैध धंदे बंद करण्याची मागणी तंटामुक्त समिती व महिलांच्या वतीने केली आहे. यावेळी निवेदन देताना महीला, तंटा मुक्त समितीचे सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती.