परभणी(Parbhani):- तालुक्यातील राहटी परिसरातून पूर्णा नदीपात्रातुन अवैध वाळुची वाहतूक (Illegal sand transport)रात्रंदिवस होत आहे. त्याचा लहान बालके, वृध्दांना व ग्रामस्थांना त्रास होत आहे. या विषयी विचारले असता अवैध वाळु उपसा धारक अरे रावीची भाषा करतात त्यामुळे तात्काळ वाळु उपसा बंद कराव अन्यथा शनिवार १५ जून पासून उपोषणाचा ईशारा देण्यात आला आहे.
अवैध वाळु उत्खननामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत आहे
पांडुरंग अमृतराव खुळे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात(statements) असे म्हटले आहे की, राहाटी परिसरातून पूर्णा नदी पात्रातुन रात्रंदिवस अवैध वाळु उपसा होत आहे. नदीपात्रात मोठं मोठे खड्डे पडले आहे. अवैध वाळु उत्खननामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत आहे. तसेच सदर अवजड वाहणे, सतत रस्त्याने वाहतूक करत असल्यामुळे रस्ते खराब होत आहेत. वाहन चालक मद्यप्राशन करुन सुसाट वाहने चालवित आहेत. त्याचा लहान मुलांसहीत ग्रामस्थांना त्रास (trouble) होत आहे. या विषयी विचारना केली असता अरेरावीची भाषा वापरली जाते. तुम्हास काय करायचे ते करा, आम्ही अवैध वाळु उत्खनन व वाहतूक बंद करणार नाही. आमचे कोणी काही करु शकत नाही, अशी अरे रावीची भाषा वापरली जाते. असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.त्यामुळे सदर वाळु वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी. अन्यथा शनिवार १५ जून पासून मौजे राहाटी पाटी येथील मारुती मंदिरा जवळ आमरण उपोषणाचा (Fast to death) ईशारा देण्यात आला आहे. निवेदनावर पांडुरग अमृतराव खुळे यांची स्वाक्षरी (Signature)आहे.
अखेर वाळू माफियांना पाठबळ कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे
पुर्णा नदीतून राहाटी परिसरातून अवैध वाळु उपसा रात्रंदिवस केला जात आहे. या विषयी विचारणा केली असता. तुम्हास काय करायचे ते करा, अवैध वाळु उपसा आणि वाहतूक बंद करणार नाही. आमचे कोणी काही करु शकत नाही. अशी आरेरावीची आणि मुजोर पणाची भाषा बाळु माफीयांकडून वापरली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थातुन आश्चर्य व्यक्त होत आहे. अवैध वाळु उपसा तात्काळ बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.