एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
परभणी (Maratha reservation) : मराठा समाजास ओबीसीचे आरक्षण मिळावे तसेच जो पर्यंत ओबीसीचे आरक्षण मिळत नाही तो पर्यंत ईडब्लुएसचे आरक्षण द्यावे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर रास्ता रोको आंदोलन (Maratha reservation) मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.
उपोषण मैदानावर मागील सात दिवसांपासून मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे प्राणांतीक उपोषण करत आहेत. शासनाकडून उपोषणाची कोणती ही दखल न घेतल्याने तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढण्याच्या मागणीसाठी (Maratha reservation) मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांनी उपोषण स्थळाच्या समोर मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
यामुळे रेल्वे स्थानक, वसमत रोडकडे जाणारी वाहतुक जवळपास एक तासा पेक्षा जास्त ठप्प झाली. आंदोलकांनी रस्त्यावरुन उठणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर बराच वेळ प्रशासन आणि आंदोलकांमध्ये चर्चा झाली. यावेळी एका मराठा समाज बांधवाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस प्रशासनाने तात्काळ मध्यस्थी करुन त्याला बाजुला घेवून गेले. यावेळी मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने मध्यस्थी
मराठा आरक्षणप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानावर सुरु असलेल्या उपोषण स्थळासमोर मंगळवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी अचानक (Maratha reservation) मराठा समाजातील समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. त्यामुळे सुरुवातीला प्रशासनाची तारांबळ उडाली मात्र तात्काळ तहसिलदार संदिप राजापुरे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी पाटील,पोनि.कामठेवाड, पोनि.मरे, पोनि.ननवरे यांनी जिल्हाधिकार्यांच्या दुरध्वनीद्वारे संपर्क करत मध्यस्थी केली. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.