छावा संघटनेची मागणी
परभणी/गंगाखेड (Chhava Sanghatan) : मार्च एन्ड वसुलीच्या नावाखाली चालू असलेला विज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार तात्काळ थांबवावा अशी मागणी (Chhava Sanghatan) अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मंगळवार २५ मार्च रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
गंगाखेड तालुक्यातील बहुतांश गावात (Chhava Sanghatan) विज ग्राहकांनी विज जोडणी पावती घेतली. मात्र त्यांना विद्युत पुरवठा करणारे मीटर बसविण्यात आले नाही. काही ग्राहकांना थेट विज जोडणी देऊन विद्युत मीटर आज येईल उद्या येईल असे म्हणत चाल ढकल केली जात आहे. विज जोडणी आहे मात्र विद्युत मीटर नाही अशा ग्राहकांचा मार्च एन्ड वसुलीच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडीत करून मोघममध्ये वसुली केली जात आहे.
काही गावात प्रत्येक विज ग्राहकांकडून ५००० रुपये प्रमाणे वसुली केल्या जात असल्याचा व नोटीस न देता विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात असल्याचा आरोप (Chhava Sanghatan) छावा संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला असुन, वसुलीच्या नावाखाली गावाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार तात्काळ थांबवून विजेचे मीटर नसलेल्या विज ग्राहकांना तातडीने विद्युत मीटर बसवावे व शेती उपयोगासाठी रात्रीच्या वेळी दिली जाणारी विज दिवसा द्यावी अशी मागणी ही (Chhava Sanghatan) अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अजय भिसे, संदिप तिगुटे, लुलाजी मात्रे, मंगेश गायकवाड, उत्तम शेळके, बालाजी आवाड, आनंदा शेळके, शरद खटिंग आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.