मानोरा(Washim) :- तालुक्यातील दापुरा ते चौसाला मुंगसाजी महाराज देवस्थान धामणगाव कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे (Inferior quality) करण्यात आले असुन याबाबत संबंधित अभियंता, उपअभियंता व कंत्राटदार यांनी केलेल्या कामाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी, याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने दि. १२ ऑगस्ट रोजी कारंजा – मानोरा रोडवर माजी प. स. सदस्य मधुसूदन राठोड यांच्या नेतृत्वात गावकरी मंडळीसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर सुरू असलेल्या आंदोलनाने वाहतूक(Transportation) खोळंबली होती. सार्वजानिक बांधकाम (Public construction) विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दोषीवर कार्यवाही करून पावसाळा नंतर रस्ता काम पुन्हा करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे
दापुरा ते चौसाला या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे एका महिन्यातच रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहे. सदरील रस्ता हाताने उखरून पाहिले की रस्त्यावर खड्डे पडत होते. त्यामुळे रस्ता कामाची चौकशी करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेल्या दोषीवर कार्यवाही करणेसंदर्भात अभियंता, उप अभियंता याजकडे लेखी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. त्यामुळे उच्च स्तरीय चौकशी (inquiry) होणे संदर्भात सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पावसाळा झाल्यावर रस्त्याचे काम करण्यात येईल. तसेच कंत्राटदार यांच्या संस्थेला काळ्या यादीत समावेश करून शाखा अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलीस बंदोबस्त तैनात
आंदोलनाला राष्ट्रवादी काँगेसचे(Nationalist Congress) प्रदेश सरचिटणीस डॉ श्याम जाधव, ज्योतीताई गणेशपुरे व प्रहरचे आदींनी भेट देवून पाठिंबा दर्शविला. रास्त रोको आंदोलनात माजी जि. प. सदस्य बंडू राऊत, माजी प. स. सदस्य गजानन भवाने, तारासिंग चव्हाण, वसंता राठोड, गंगादास राठोड, रवि राऊत, सुनिल बाजारे, सुनिल पवार, दिपांशू राठोड, अजय चव्हाण, अशोक राठोड, इंदल राठोड, गोपाळ राठोड, श्याम राठोड, ज्ञानेश्वर साळुंखे, गजानन डहाके, गोपाळ यादव, हिम्मत राऊत, रुपेश बाजारे, अनिल राठोड, भगवान दिघडे, जगदीश दीघडे यांच्यासह शेकडो नागरीक सहभागी झाले होते. आंदोलन घटना स्थळी पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.